CHHATRAPATI SAMBHAJINAGAR CRIME BRANCH SEIZES ₹5.26 CRORE CASH, WEAPONS AND GOLD IN MITMITA RAID Saam Tv
महाराष्ट्र

Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये मोठी कारवाई! मृत व्यक्तीच्या घराची झाडाझडती घेतली, पोलिसांनी दार उघडला, आतील दृश्य बघून हादरले

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरच्या मिटमिटा भागात गुन्हे शाखेची मोठी कारवाई. एका घरातून ५.२६ कोटी रुपयांची रोकड, अग्निशस्त्रे, ६३२ जिवंत काडतुसे, सोने-चांदीचे दागिने आणि विदेशी दारू जप्त.

Alisha Khedekar

  • छत्रपती संभाजीनगरच्या मिटमिटा भागात गुन्हे शाखेने मोठा छापा टाकला

  • कारवाईत ५.२६ कोटी रुपयांची रोकड जप्त

  • १ रिव्हॉल्व्हर, २ पिस्तुले, ४ रायफल्स आणि ६३२ जिवंत काडतुसे हस्तगत

  • सोन्याचे व चांदीचे दागिने, धारदार शस्त्रे आणि विदेशी दारूही जप्त

छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर आली आहे. शहरातील मिटमिटा भागात गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत एका घरातून तब्बल ५ कोटी २६ लाख २९ हजार ५६० रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर गावठी आणि विदेशी अग्निशस्त्रे, जिवंत काडतुसे आणि धारदार शस्त्रांचा प्रचंड साठा जप्त केला आहे. याशिवाय या घरातून लाखो रुपयांचे सोने-चांदीचे दागिने आणि विदेशी दारूही जप्त करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून पोलीस विभागातही चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात शिलाबाई बाबाफर्जान दोरडी हिच्याविरुद्ध शस्त्र अधिनियम, महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिटमिटा परिसरातील रहिवासी बाबा फर्जन यांच्या घरात मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम, शस्त्रे आणि दारूचा अवैध साठा असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. बाबा फर्जन यांचे १३ जून २०२६ रोजी निधन झाले आहे. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित घरावर छापा टाकला. पोलिसांनी छापा टाकताच धक्कादायक चित्र पाहायला मिळालं.

पोलिसांनी तपासणीदरम्यान घरातील कपाटांचे लॉक तोडून पाहणी केली. यावेळी प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून ठेवलेल्या कोट्यवधी रुपयांच्या नोटा, रिव्हॉल्व्हर, पिस्तुले, रायफल्स आणि विविध प्रकारची धारदार शस्त्रे आढळून आली. एवढ्या मोठ्या प्रमाणातील रोख रक्कम आणि शस्त्रसाठा पाहून पोलीस अधिकारीही काही काळ चकित झाले.

कारवाईत ५ कोटी २६ लाख २९ हजार ५६० रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. याशिवाय १ रिव्हॉल्व्हर, २ पिस्तुले, ४ रायफल्स, ४ मॅगझिन आणि ६३२ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. तसेच सुमारे १५१ ग्रॅम सोन्याचे दागिने, ३.९ किलोपेक्षा अधिक चांदीचे दागिने व शिक्के, विविध प्रकारची धारदार शस्त्रे आणि विदेशी दारूही जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असून एवढी मोठी रोख रक्कम आणि शस्त्रसाठा कुठून आला, याचा शोध घेण्यासाठी विविध यंत्रणा तपासात सहभागी झाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care : रात्री सतत लघवीला होते? 'या' आजाराची असू शकतात गंभीर कारणे

धक्कादायक ! प्रसुतीसाठी गेलेल्या महिलेचं नवजात बाळ जमिनीवर पडलं, रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप, VIDEO

मखमली सूर थांबले... ज्येष्ठ गायिकेचं निधन, संगीत क्षेत्रात शोककळा

VIRAL VIDEO : ज्वेलर्समधून १० लाखांचे सोन्याचे दागिने गायब, सीसीटीव्ही फुटेज बघितल्यानंतर हादरलाच, मालकाचा जीव भांड्यात पडला, VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: :- डॉ. हेडगेवार निवास या ऐतिहासिक वास्तूवर आधारित सचित्र टपाल मुद्रेचे लोकार्पण कार्यक्रम नागपुरात पार पडला

SCROLL FOR NEXT