Chhatrapati Sambhajinagar Crime Saamtv
महाराष्ट्र

Sillod Crime News: भयंकर! विळ्याने वार करुन तरुणाची निर्घृण हत्या; प्रेम प्रकरणातून चौघांनी काढला काटा

Manglur Crime News: हत्येनंतर आरोपींनी पळ काढला असून पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Gangappa Pujari

नवनीत तापडिया, प्रतिनिधी...

Chhatrapati Sambhajinagar Crime News: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक हादरवुन सोडणारी घटना समोर येत आहे. प्रेम प्रकरणातून चौघांनी एका तरुणाची निर्घृण हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या धक्कादायक घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास कार्यास सुरूवात केली आहे. (Sillod Manglur Crime News)

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रेम प्रकरणातून एका तरुणाची चौघांनी विळ्याने गळा चिरुन हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) सिल्लोड तालुक्यातील मंगरूळ येथे घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. समाधान यादवराव बोराडे असे या तरुणाचे नाव असून गावातीलच चार जणांनी मिळून त्याची हत्या केल्याचे समोर आले आहे.

प्रेमाच्या संशयातून ही भयंकर हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. हत्येनंतर आरोपींनी पळ काढला असून पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. या भयानक प्रकरणाने संपूर्ण गावात तणावपुर्ण शांतता पाहायला मिळत आहे. हत्येतील आरोपींना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. (Latest Marathi News)

दगडाने ठेचून तरुणाची निर्घृण हत्या..

दरम्यान, मुंबईच्या बोरीवली मधूनही अशीच भयंकर हत्येची घटना उघडकीस आली होती. दोन दिवसांपूर्वी रीवली रेल्वे स्टेशनच्या हद्दीत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. पोलिस अधिक तपास करताना एकाच तरुणीवर दोघांचा जीव जडल्याने ही भयंकर हत्या झाल्याचे समोर आले होते. (Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नगरसेवकाचा लोगो, BMW गाडी आणि आत 32 कोटींचं MD ड्रग | VIDEO

Maharashtra Live News Update: ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Ajit Pawar: चिकन-मटण शॉपवर बंदी घालणं अयोग्य; उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य; मग आदेश कोणी काढला?

Organic Incense Sticks : सुगंधीत धूप विकत कशाला? घरीच ऑरगॅनिक धूपच्या कांड्या करा तयार

29 ऑगस्टला होणाऱ्या मराठा मोर्चासाठी गावागावात बैठका सुरू पाहा, VIDEO

SCROLL FOR NEXT