Chhatrapati Sambhajinagar Accident 
महाराष्ट्र

Accident : लग्नासाठी जाताना काळाचा घाला, २ दुचाकी धडकल्या, ३ जणांचा जागीच मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर

Chhatrapati Sambhajinagar Accident : छत्रपती संभाजीनगरच्या खराडी-मलकापूर रोडवर दोन दुचाकींमध्ये समोरासमोर धडक होऊन तिघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. हे तरुण लग्नासाठी जात असताना ही दुर्घटना घडली.

डॉ. माधव सावरगावे

Chhatrapati Sambhajinagar Accident : छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन दुचाकींचा समोरासमोर भीषण अपघात झालाय. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी आहे. जखणींवर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहे. जखमी तरूणाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजतेय. खराडी ते मलकापूर रोडवर दोन दुचाकीची धडक झाल्याची माहिती मिळत आहे.

छत्रपती संभाजीनगरातील वाळूज महानगरातील तुर्काबाद खराडी ते मलकापूर रोडवर दोन मोटरसायकली समोरासमोर धडकल्या. या अपघातात तीन जण ठार झाले. तर एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. आकाश मच्छिंद्र साठे, सुमित आप्पासाहेब आव्हाड आणि मुस्ताक मुनीर शाह अशी अपघातात मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आकाश आणि सुमित हे दुचाकीवर लग्नासाठी जात होते तर मुस्ताक आणि मुबारक हे दोघेही दुचाकीवर तुर्काबादच्या दिशेने जात होते. यावेळी शिरोडी शिवारात दोन्ही दुचाकी समोरासमोर धडकल्या अन् चौघेही रस्त्यावर फेकले गेले. यातील तिघांचा जागेवरच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्यानं कारागृहातच स्वत:ला संपवलं, अंतर्वस्त्रानंच....

Akola Crime : धक्कादायक! अकोल्यात एमडी ड्रग्स तस्करी; आरोपीचं वंचित बहुजन आघाडीचं कनेक्शन उघड

PAN Card: तुम्हीही अजून पॅन कार्ड-आधार कार्डसोबत लिंक केलं नाही? नवा नियम लागू, बसेल मोठा फटका

Maharashtra Live News Update: मावळमध्ये एसटी बस आणि खासगी बसचा अपघात, 11 प्रवासी जखमी

Mumbai Metro: ठाणे ते गेट वे ऑफ इंडिया; आणखी एका मेट्रोचा प्रस्ताव, 13 ठिकाणी असणार स्टॉप

SCROLL FOR NEXT