Supporters celebrate after independent candidate Sachin Garad secures a dramatic one-vote victory in the Zilla Parishad elections. Saam Tv
महाराष्ट्र

पोस्टल मतांनी उलटवला खेळ; अपक्ष उमेदवाराचा अवघ्या १ मताने विजय, शिंदेंच्या उमेदवाराला चारली धूळ

Aurangabad Zilla Parishad Election Results One Vote Thriller: संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीत चकीत करणारा निकाल समोर आला आहे. वडगाव कोल्हाटी गटात अपक्ष उमेदवार सचिन गरड यांनी अवघ्या एका मताने विजय मिळवत निवडणूक इतिहासात आपले नाव कोरले.

Omkar Sonawane

जिल्हापरिषदेच्या निवडणुकीचा निकाल आज लागला असून यामध्ये अनेक दिग्गजांचा पराभव झाला आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील वडगाव कोल्हाटी मध्य पश्चिम गटात झालेल्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार सचिन गरड यांनी अवघ्या १ मतांच्या फरकाने थरारक विजय मिळवला आहे.ईव्हीएम मतदानात सचिन गरड हे १७ मतांनी आघाडीवर होते. मात्र पोस्टल मतदानाची मोजणी झाल्यानंतर चित्र बदलले. एकूण १६ पोस्टल मते ही सर्व शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार हनुमान भोंडवे यांचा अवघ्या 1 मताने पराभव झाला. त्यानंतर झालेल्या रिकाउंटिंगमध्येही पुन्हा एकदा मतमोजणी करण्यात आली. मात्र अंतिम निकालात सचिन गरड यांनी १ मतांच्या फरकाने विजय कायम ठेवत बाजी मारली. या निकालामुळे मतदारसंघात मोठा जल्लोष सुरू झाला असून, एका मताने ठरलेला हा निकाल निवडणूक इतिहासातील अत्यंत थरारक लढतींपैकी एक ठरला आहे.

तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर एकहाती वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर नियोजनाचा बादशहा म्हणून शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार विलास भुमरे यांचे पोस्टर कार्यकर्त्यांनी झळकवले. संभाजीनगरचे खासदार संदीपान भूमरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यांचे चिरंजीव आमदार विलास भूमरे यांनी जोरदार ताकद लावत हा विजय खेचून आणला.

छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती निकाल : एकूण ९ पंचायत समिती -

१)छत्रपती संभाजीनगर एकूण (२०)

भाजप : 6

शिवसेना : 6

शिवसेना UBT: 5

NCP : 0

MIM : 1

काँग्रेस : 1

इतर : 1

२)पैठण तालुका (१८)

भाजप : 0

शिवसेना : 12

शिवसेना UBT: 3

NCP : 2

काँग्रेस : 1

इतर :

३)गंगापूर तालुका (१८)

भाजप : 6

शिवसेना : 2

शिवसेना UBT:2

NCP : 5

एमआयएम : 1

इतर : 2

४)वैजापूर तालुका (१६)

भाजप : 3

शिवसेना : 5

शिवसेना UBT: 3

NCP : 3

NCP SP :

Other : 2

५)कन्नड तालुका (१६)

भाजप : 5

शिवसेना : 7

शिवसेना UBT:

NCP :

काँग्रेस : 2

इतर : 2

६)खुलताबाद तालुका (६)

भाजप : 3

शिवसेना :

शिवसेना UBT: 1

NCP : 2

७)फुलंब्री तालुका (८) :

भाजप : 3

शिवसेना : 2

शिवसेना UBT: 1

NCP : 1

काँग्रेस : 1

८)सिल्लोड तालुका (१८)

भाजप : 5

शिवसेना : 5

शिवसेना UBT:

NCP :

९)सोयगाव तालुका (६) :

भाजप : 3

शिवसेना : 2

शिवसेना UBT: 1

NCP : 0

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Glowing Face Pack: चेहऱ्यावर फेसपॅक लावताना या 5 गोष्टींची घ्या काळजी, नाहीतर...

ZP Election : माजी मंत्र्याला मोठा धक्का; कुटुंबातील ५ पैकी ४ पराभूत, मतदारांनी घराणेशाही नाकारली

Maharashtra Live News Update: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपचारासाठी रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करणार

ZP Election Results : पुण्यात भाजपचा धुव्वा; अजितदादांच्या राष्ट्रवादीची एकहाती सत्ता

Zilla Parishad Election Result 2026 LIVE Updates : मोठी बातमी! सोलापूरच्या पालकमंत्र्यांना जोरदार धक्का

SCROLL FOR NEXT