Chhatrapati sambhajinagar Saam
महाराष्ट्र

आईनं अभ्यास कर म्हटल्याचा राग; नर्सिंगच्या विद्यार्थिनीनं राहत्या घरात आयुष्याचा दोर कापला

Chhatrapati sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये १८ वर्षीय नर्सिंग विद्यार्थिनीची आत्महत्या. आईनं अभ्यास करण्यास सांगितल्यामुळे तरूणीनं टोकाचं पाऊल उचललं.

Bhagyashree Kamble

  • अभ्यास करण्यास सांगितल्याने आईवर राग धरून गळफास घेतला

  • विशाखा अनिल वक्ते ही तरुणी वडगाव कोल्हाटी येथे राहत होती

  • तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले पण डॉक्टरांनी मृत घोषित केले

  • वाळूज पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली

अभ्यास करण्यास सांगितल्याने आईवर राग धरून तरूणीनं टोकाचं पाऊल उचललंय. १८ वर्षीय नर्सिंगच्या विद्यार्थिनीनं गळफास घेऊन आयुष्य संपवलंय. ही धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमधून उघडकीस आली आहे. तरूणीला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

विशाखा अनिल वक्ते (वय वर्ष १८)असे तरूणीचे नाव आहे. ती छत्रपती संभाजीनगरमधील वडगाव कोल्हाटी भागात रहिवासी आहे. विशाखा नर्सिंगच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होती. तर, तिचे वडील एका कंपनीत काम करतात. ही घटना रविवारी उघडकीस आली. घटनेच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास विशाखा टिव्ही पाहत होती.

त्यावेळेस विशाखाची आई किचनमधून बाहेर आली. नंतर विशाखाला अभ्यास करण्यास सांगितले. नंतर विशाखाची आई किचनमध्ये गेली. त्यावेळी विशाखाचा लहान भाऊ दुसऱ्या खोलीत अभ्यास करत होता. विशाखाला आईच्या बोलण्याचा राग आला. राग मनात धरून विशाखा तिसऱ्या मजल्यावर गेली.

घरातील तिसऱ्या मजल्यावरील पायऱ्यांवर तिनं गळफास लावून आत्महत्या केली. विशाखाला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून आईला धक्का बसला. तिनं तातडीने शेजाऱ्यांना बोलावून घेतलं. तसेच विशाखाला बेशुद्धावस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून विशाखाला मृत घोषित केले. या घटनेनंतर विशाखाच्या कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sidharth Malhotra Father Passes Away: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, सिद्धार्थ मल्होत्राला पितृशोक

Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी पडझड; काय आहे दिवसाअखेरचा दर?

मोठी बातमी! मुस्लीम समाजाचं ५ टक्के आरक्षण रद्द, अचानक नेमकं काय घडलं? VIDEO

रशिया-पाकिस्तानमध्ये 'यारीदोस्ती'; भारताच्या संरक्षण सज्जतेपुढे आव्हान, VIDEO

Gram Panchayat Elections: दिवाळीत उडणार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार? मतदानाबाबत नवी अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT