Chhatrapati Sambhaji nagar :  Saam tv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhaji nagar : आईसोबत शेतात गेले पुन्हा परतलेच नाही; दोन भावांचा विहिरीत पडून मृत्यू

Chhatrapati Sambhaji nagar Latest News : छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन भावांचा दुर्दैवी अंत झाला. दोन भावांचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये दुर्देवी घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आईसोबत शेतात गेलेल्या दोन सख्खा भावांचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातल्या रजापूर शिवारात ही घटना घडली. या घटनेने रजापुरात खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

छत्रपती संभाजीनगरच्या आडूळ बुद्रुक येथील कृष्णा विठ्ठल फणसे यांची रजापूर शिवारात शेती आहे. त्यांच्या स्वतःच्या शेतात आज मंगळवारी कृष्णा फणसे यांची पत्नी वर्षा फणसे आणि त्यांची दोन मुले प्रणव आणि जय असे तिघे जण सकाळी गेले होते. वर्षा फणसे ही शेतातील सोंगलेल्या तुरीचे पेटे एकटी जमा करीत होती. तसेच त्यांची दोन्ही मुले बाजुला खेळत असताना वर्षा हिची नजर चुकवून दोघे कठडे नसलेल्या विहीरिकडे गेले. तेथे खेळत असताना त्यांचा तोल जाऊन ६ वर्षीय प्रणव आणि ९ वर्षीय जय या दोन्ही भावंडाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

विहिरित पडलेल्या आवाजामुळे वर्षा विहिरीकडे पळत सुटली. तिने आरडाओरड केल्याने आजूबाजूच्या शेतातील नागरिकांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेऊन पाचोड पोलीस ठाण्यात याची माहिती दिली. यानंतर ताबडतोब सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे, बीट जमादार अफसर बागवान आणि रणजीत दुल्हत यांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने प्रणव याचा मृतदेह विहिरीच्या बाहेर काढला. तसेच मोठा मुलगा जय याचा मृतदेह लवकर सापडत नसल्याने शेवटी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अग्निशमन दलाच्या जवानांना पचारण करावे लागले.

इन्चार्ज विनायक कदम, फायरमन रितेश कसुरे, छगन सलामबाद,कमलेश सलामबाद,विशाल गरडे, रावसाहेब जाधव,रावसाहेब वाकळे,रामदास राऊत यांनी परिश्रम घेऊन विहिरीतील गाळात अडकलेले जयचे प्रेत बाहेर काढले. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात सायंकाळी दोघांचे शवविच्छेदन करून शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT