Chhatrapati Sambhaji Nagar News Saam TV
महाराष्ट्र

Kannad News: अवकाळीमुळे शेतीपिक मातीत, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तणावातून शेतकरी महिलेनं संपवलं जीवन

Chhatrapati Sambhaji Nagar News: कर्जबाजारी पणाला कंटाळून एका शेतकरी महिलेनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे

साम टिव्ही ब्युरो

Chhatrapati Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक दुर्देवी घटना समोर आली आहे. कर्जबाजारी पणाला कंटाळून एका शेतकरी महिलेनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात ही घटना घडली. आशाबाई गोविंद हरणकाळ असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. (Breaking Marathi News)

खरीप हंगामात अतिवृष्टी तर रब्बीत गारपीट आणि अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने त्यांनी हे पाऊल उचलल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. (Latest Marathi News)

राज्यात गेल्या महिन्याभरापासून अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अवकाळीसह मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गारपीटीने शेतपिकांचं मोठं नुकसान झालं आहे. हातातोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावून नेल्याने बळीराजाला अश्रू अनावर झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यातही अवकाळीने शेतीपीकांचं मोठं नुकसान केलं आहे.

अशातच कन्नड तालुक्यातील शफेपूर येथील महिला शेतकरी आशाबाई यांनी मुलाच्या नावावर उसनवारी करत सोसायटीचे कर्ज घेतले होते. मागील खरीप हंगामातील पीक अतिवृष्टीमुळे वाया गेले होते.

रब्बीतील पिकांनाही गारपीट व अवकाळी पावसाचा फटका बसला. आता हे कर्ज कसे फेडावे याची चिंता त्यांना सतावत होती. याच विवंचनेतून त्यांनी विहिरीत उडी घेतल्याचे नातेवाइकांनी सांगितले.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli Politics: सांगलीमध्ये भाजपचा करेक्ट कार्यक्रम, काँग्रेसने मारली बाजी; ३ पंचायत समित्यांवर वर्चस्व

Navale Bridge Accident: पुण्यातील नवले ब्रिजवर अपघाताचं सत्र सुरुच, भरधाव कार महामार्गावर उलटली | VIDEO

Maharashtra Live News Update : घरगुती गॅसचा अवैध वापर केल्या प्रकरणी पहिला गुन्हा दाखल

Monalisa Love Story : "६ महिने ६० वर्षांसारखे जगलो..."; मोनालिसाच्या नवऱ्याने सांगितली प्रेम कहाणी, वाचा काय म्हणाला

Skin Care : त्वचेवर दिवसातील कोणत्या वेळेस कोरफडीचे जेल लावावे? जाणून घ्या फायदे

SCROLL FOR NEXT