नवनीत तापडिया, छत्रपती संभाजीनगर
Chhatrapati Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजीनगर येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. दोन महिलांच्या झालेल्या भांडणात एका कुत्र्याला आपला जीव गमवावा लागला आहे. सदर घटनेत महिलेविरोध गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करतायत. (Latest Marathi News)
कुत्रा हा एक पाळीव आणि इमानी प्राणी आहे. त्यामुळे अनेक व्यक्ती घरी कुत्रे पाळतात. घरातील एका सदस्याप्रमाणे त्यांचे पालनपोषण करतात. त्यामुळे कुत्रा देखील घरातील सदस्यांचे रक्षण करतो. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) येथील दगडगल्ली कुंभारवाडा परिसरात कुत्र्याच्या मृत्यूची घटना घडली आहे. या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आधी दोन कुत्र्यांची भांडणं
सदर परिसरात शेजारी शेजारी (Neighbors) राहणाऱ्या दोन्ही कुटुंबात पाळीव कुत्रा आहे. अचानक या दोन कुत्र्यांमध्ये भांडण सुरु झालं. कुत्र्यांची भांडणे झाल्यानंतर दोघी शेजारणीत तू तू मै मै सुरू झाली. दोघींनी एकमेकींना अपशब्द वापरले. हा वाद झोंबझोंबीपर्यंत पोहचला होता.
शेजारणीच्या कुत्र्यावर भडकली महिला
दोघींचे भांडण सुरू असताना आरोपी महिलेला शेजारणीचा कुत्रा दिसला. याच कुत्र्याने (Dog) आपल्या कुत्र्याशी भांडण केले. आता शेजारचे भांडत आहेत. या रागातून तिने त्या कुत्र्यावर विटांचे प्रहार केले. महिलेच्या हल्ल्याने कुत्रा गंभीर जखमी होऊन अर्धमेला झाला. त्याला उपचारसाठी दवाखान्यात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला.
कुत्र्याला दगड विटांनी मारून गंभीर जखमी करत मरणाला कारणीभूत ठरल्याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून सिटी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पुढील तपास सहायक फौजदार वाघ करीत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.