Fire News Saam tv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhaji Nagar Fire News : मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये केबलच्या दुकानाला भीषण आग; अग्निशामक दल घटनास्थळी दाखल

अग्निशामक दलाच्या 3 ते 4 गाड्या आणि पाण्याचे टँकर पोहचले असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.

साम टिव्ही ब्युरो

Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये आगीची मोठी घटना घडली आहे. शहरातील प्रोझोन मॉल समोरील केबलच्या दुकानाला भीषण आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या 3 ते 4 गाड्या आणि पाण्याचे टँकर पोहचले असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. (Latest Marathi News)

सकाळच्या सुमारास दुकानाला ही आग लागली आहे. आगीमुळे दुकानील भरपूर साहित्य जळून खाक झाले आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

कानपूर येथे देखील आगीची मोठी दुर्घटना घडली आहे. कानपूरच्या बासमंडी परिसरत भीषण आग लागली आहे. परिसरात असलेल्या एअर टॉवर या इमारतीला ही आग लागल्याने यात अरबो रुपयांचे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत इमारतीमधील ५०० हून अधिक दुकानं जळून खाक झाली आहेत. घटनास्थळी अग्निशामक दलाची वाहने दाखल झाली असून आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आताची सर्वात मोठी बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत मोठी संधी; भाजपच्या 'या' सर्वात ताकदवर समितीत होणार एन्ट्री?

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

FD Break Rules: FD तोडण्याचा विचार करताय? आधी जाणून घ्या बँक किती पेनल्टी कापते आणि नुकसान कसे टाळाल

Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांना बसणार फटका?

Mobile Safety Tip : मोबाईल भिजल्यावर तांदळाच्या डब्यात ठेवताय? जाणून घ्या खरंच फोन दुरूस्त होतो का

SCROLL FOR NEXT