Satej Patil, Mahadevrao Mahadik,  saam tv
महाराष्ट्र

Rajaram Sahakari Sakhar Karkhana Election Result: राजाराम कारखाना निकाल; पहिल्या फेरीत सत्ताधारी महाडिक गटाची सरशी

Chhatrapati Rajaram Sahakari Sakhar Karkhana Election Result: आज दुपारपर्यंत सभासदांनी काेणाला काैल दिला हे स्पष्ट हाेईल.

संभाजी थोरात

Kolhapur News : कोल्हापुरातील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या (Rajaram Sahakari Sakhar Karkhana Election Result) मतमाेजणीचा पहिला काैल हाती आला आहे. आज (मंगळवार) सकाळी आठ वाजता मतमाेजणीस प्रारंभ झाला. अकरा वाजेपर्यंत सत्ताधारी महादेवराव महाडीक यांच्या गटाने उत्पादक गटात आघाडी मिळवली आहे. (Breaking Marathi News)

माजी मंत्री सतेज पाटील (satej patil) विरोधात माजी आमदार महादेवराव महाडिक (mahadevrao mahadik) यांच्या गटात मुख्य लढत आहे. या निवडणुकीत 21 जागांसाठी 44 उमेदवार रिंगणात आहेत. रविवारी अंत्यत चुरशीने 12 हजार 336 (91.12 टक्के) इतके मतदान झालं हाेते. आज सकाळी आठ वाजता मतमाेजणीच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला. दुपारपर्यंत सभासदांनी काैल काेणाला दिला हे स्पष्ट हाेणार आहे.

महाडिक गटाचे राजर्षी शाहू सहकार आघाडीची पहिल्या फेरीत आघाडी.

छत्रपती राजाराम कारखाना निवडणुकीच्या मतमोजणीचा पहिला कल हाती आला आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक आणि आमदार सतेज पाटील गटात प्रचंड चुरस असल्याचे दिसून आले.

पहिल्या फेरीत सत्ताधारी छत्रपती राजर्षी शाहू सहकारी आघाडी उत्पादक गट क्रमांक एक मध्ये आघाडीवर आहे.

उत्पादक गट क्रमांक 1 मध्ये सत्ताधारी आघाडीवर

गट क्रमांक 1 पहिल्या फेरी अखेर मतदान

आमदार सतेज (बंटी) पाटील पॅनल

- बेनाडे शालन बाबुराव- 2441 मते

- भोसले किरण बाबासो-2413

महाडिक पॅनेल

- भोसले विजय वसंत -3244

- मगदूम संजय बाळगोंडा-3169

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: ओळखपत्र,मोबाईल हिसकावला नंतर खांबाला बांधलं; ड्युटीवर निघालेल्या लष्कर जवानासोबत टोल कर्मचाऱ्यांचं संतापजनक कृत्य

Pregnancy Tips : गर्भावस्थेतील मधुमेह नियंत्रणात ठेवणे का आवश्यक आहे?

Pandharpur: डॉल्बीच्या आवाजामुळे एकाचा मृत्यू, दंहीहंडीचा कार्यक्रम पाहायला आला अन्...; पंढरपुरात खळबळ

Hair Loss Remedie : टक्कल पडण्याची समस्या? हे घरगुती उपाय करतील मदत

Rahul Gandhi: व्होट चोरीवरून टोकदार प्रश्न, निवडणूक आयोगानं दिली उत्तरं; तुम्ही समाधानी आहेत का?

SCROLL FOR NEXT