Chhagan Bhujbal Saam tv
महाराष्ट्र

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ नाराज; फडणवीस सरकारच्या शपथविधीला गैरहजेरी, कारण काय?

Chhagan Bhujbal Latest news : छगन भुजबळ नाराज असल्याची माहिती मिळत आहे. भुजबळ यांची फडणवीस सरकारच्या शपथविधीला गैरहजेरी दिसून आली आहे.

Vishal Gangurde

नागपूर : महायुती सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी होत आहे. महायुती सरकारच्या ३९ मंत्र्यांचा शपथविधी होत आहे. या सोहळ्याआधी अजित पवारांचं धक्कातंत्र पाहायला मिळालं. नव्या फडवणीस सरकारच्या मंत्र्यांच्या यादीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांचा पत्ता कट झाल्याची माहिती मिळाली आहे. छगन भुजबळ यांचा पत्ता कट झाल्याने ते नाराज झालेत. मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झालेले छगन भुजबळ यांची शपथविधी सोहळ्याला गैरहजेरी दिसून आली. छगन भुजबळ यांच्या गैरहजेरीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

अजित पवार गटाच्या १० मंत्र्यांचा आज शपथविधी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, यंदा अजित पवार गटाकडून छगन भुजबळ यांना डच्चू मिळाला आहे. छगन भुजबळ यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. मात्र, यंदा छगन भुजबळ यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली नाही. त्यामुळे नाराज झालेले छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यालाही उपस्थिती दर्शवली नाही. छगन भुजबळ हे कालपासून नागपूरच्या रेडिसन्स ब्लू या हॉटेलमध्ये मुक्कामी होते. मात्र, त्यांनी पक्षाच्या मेळाव्याला छगन भुजबळ यांनी उपस्थिती दर्शवली नाही.

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या मंत्र्यांच्या यादीतून छगन भुजबळ यांचा पत्ता कट झाला आहे. भुजबळ यांना मंत्रिपदासाठी कॉल न आल्याने ते नाराज असल्याची चर्चा आहे. मंत्रिपद न मिळाल्याने नाराज छगन भुजबळ यांनी शपथविधी सोहळ्यालाही हजेरी लावली नाही. नाराज झालेले छगन भुजबळ आता कोणता निर्णय घेणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

फडणवीस सरकारमध्ये अजित पवार गटाकडून कोण कोण मंत्री असणार?

अजित पवार, उपमुख्यमंत्री, अर्थ मंत्रालय

धनंजय मुंडे

अदिती तटकरे

हसन मुश्रीफ

दत्ता भरणे

नरहरी झिरवळ

मकरंद आबा पाटील

इंद्रनील नाईक

⁠माणिकराव कोकाटे

बाबासाहेब पाटील

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026 मध्ये CSKवर काळी जादू? थेट BCCIकडे तक्रार; व्हायरल व्हिडिओ आणि पत्राचं सत्य काय?

Rohit Sharma: रोहित शर्मा फीट असूनही प्लेईंग ११ मधून का बाहेर? चाहत्यांच्या मनात मोठा प्रश्न

लॉजमध्ये तरुणीची निर्घृण हत्या; मृतदेहाची अवस्था पाहून पोलिसही हादरले

Maharashtra News Live Update:- भाजपाला महिला आरक्षण द्यायचं नाही..केवळ राजकारण करायचे आहे - खासदार विशाल पाटील

सहर शेख यांचे नगरसेवक पद जाणार? बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT