Manoj Jarange vs Chhagan Bhujbal Saam TV
महाराष्ट्र

Chhagan bhujbal : ऐन विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात पुन्हा जुंपली

Chhagan bhujbal on manoj Jarange patil : मनोज जरांगे पाटील यांच्या टीकेनंतर छगन भुजबळ यांच्याकडून समाचार घेतला. जरांगे पाटील यांच्या टीकेला भुजबळांकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

Vishal Gangurde

अजय सोनवणे, साम टीव्ही प्रतिनिधी

नाशिक : मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्या विरोधात दंड थोपडले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी येवला दौरा करत सभेतून त्यांनी नाव न घेता छगन भुजबळ यांना लक्ष्य केलं. येवला पवित्र करा, असा संदेश मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना दिला. येवल्यातील मनोज जरांगे पाटील यांच्या सभेनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. याचदरम्यान, छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

मनोज जरांगे पाटील यांनी येवल्यातील अंदरसूलमध्ये नाव न घेता छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडण्याचं आवाहन केलं. मनोज जरांगे पाटील यांच्या टीकेनंतर अजित पवार गटाचे येवल्यातील उमेदवार छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

छगन भुजबळ म्हणाले, 'मनोज जरांगे पाटील मतदारसंघात सांत्वन करण्यासाठी आले होते ही चांगली गोष्ट आहे. ज्या लोकांनी आरक्षणाला विरोध केला, त्यांना पाडा असे त्यांचं म्हणणं आहे. मात्र आम्ही कोणीच आरक्षणाला विरोध करत नाही. त्यामुळे आमचा प्रश्न नाही. आम्ही फक्त मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावे, अशी मागणी करतोय. लोकशाहीत सर्वांना आधिकर दिले आहे. लोकशाही मार्गाने आणि शांततेने प्रश्न मांडावे'.

दरम्यान, छगन भुजबळ यांनी येवला पवित्र करण्याच्या मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला. 'येवला पवित्र आहे. येवला स्वातंत्र्य सेनानी सेनापती बापट यांची भूमी आहे. जगदंबा माता, खंडोबा मंदिर या भूमीत आहे. येवल्यातील लोक अतिशय पवित्र आहे, असं म्हणत भुजबळ यांनी जरांगे यांना प्रत्युत्तर दिलं.

मनोज जरांगे पाटील यांनी माईकवरून केलेल्या टीकेवर छगन भुजबळांनी प्रत्युत्तर दिलं. 'ज्यांना काय बोलायचे ते त्यांनी बोलावं. आपण आपले करत राहायचे,पण जुनं ते सोनं असं म्हणतात., अशी कोपरखळी छगन भुजबळांनी मारली. सभेला गर्दी चांगली होती. उत्साह आणि प्रतिसाद मिळतोय. मी येवल्याच्या पवित्र जनतेचा आभारी आहे, असेही भुजबळ म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT