Maharashtra Politics: काल शरद पवार यांची येवलामध्ये सभा झाली. या सभेवेळी शरद पवारांनी मंत्री छगन भुजबळांवर निशाणा साधत माफी मागितली. पवारांनी माफी मागितल्यावर आज भुजबळांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. तुम्ही किती ठिकाणी माफी मागणार? असा खोचक प्रश्न भुजबळांनी विचारला आहे. (Latest Marathi News)
मला हेच कळलं नाही की ते का आले. मला वाईट वाटलं की तुम्ही माफी मागताय. तुम्ही अशी किती ठिकाणी माफी मागणार आहात. ५० ठिकाणी? गोंदियापासून कोल्हापूरपर्यंत आणि पुण्यापासून बीडपर्यंत तुम्ही माफी मागणार आहात का? कशासाठी माफी मागता, असा खोचक सवाल भुजबळांनी विचारला आहे.
ज्यांना तुम्ही इतके दिवस सांभाळलं त्या अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. ते का गेले? याचा तुम्ही विचार करा. बारामतीनंतर सर्वाधिक विकास येवल्यात झाला. मी येवला मागितला पवारांनी दिला नाही, असा दावाही भुजबळांनी यावेळी केला.
शरद पवारांनी काय म्हटलं?
आज मी या ठिकाणी माफी मागण्यासाठी आलो आहे. माझा अंदाज सहसा चुकत नाही, मात्र इथे चुकला. माझ्या विचारांवर तुम्ही निकाल घेतले. त्यामुळे तुम्हाला यातना झाल्या. तुम्हाला यातना माझ्या निर्णयामुळे झाल्या असतील तर तुम्हा सगळ्यांची मी माफी मागतो, असं काल येवल्यात झालेल्या सभेत शरद पवार म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.