Chhagan Bhujbal  Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Sadan Scam: महाराष्ट्र सदन घोटाळा: ४ याचिकांवर स्वतंत्र सुनावणी होणार, छगन भुजबळांच्या अडचणी वाढल्या?

Maharashtra Breaking News: महाराष्ट्र सदन घोटाळ्यात राज्याचे अन्नपुरवठा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. मात्र आज झालेल्या सुनावणीत या प्रकरणी चार वेगवेगळ्या याचिकांवर स्वतंत्र सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Gangappa Pujari

सचिन गाड, मुंबई|ता. १ एप्रिल २०२४

Maharashtra Sadan scam Case Update:

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र सदन घोटाळ्यात राज्याचे अन्नपुरवठा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. मात्र आज झालेल्या सुनावणीत या प्रकरणी चार वेगवेगळ्या याचिकांवर स्वतंत्र सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सर्वोच्च न्यायालयात अंजली दमानिया यांनी महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी दाखल केलेली याचिका निकाली आहे. अशातच अंजली दमानिया यांनी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना निर्दोष करार देणाऱ्या कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयातील अनेक न्यायाधीशांनी not before me केल्यामुळे सुनावणी होत नव्हती. मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होत नाही म्हणून अंजली दमानिया यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

त्यानुसार आता हे प्रकरण आज मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश मोडक यांच्यासमोर सुनावणीसाठी पार पडली. या सुनावणीत न्यायाधीश मोडक यांनी संपूर्ण प्रकरण जाणून घेतल्यानंतर चार वेगवेगळ्या याचिकांवर स्वतंत्र होणार सुनावणी होणार असल्याचे सांगितले आहे. तसेच या प्रकरणाची पुढील सुनावणी 15 एप्रिल आणि 29 एप्रिल ला स्वतंत्र होणार आहे.

काय आहे महाराष्ट्र सदन घोटाळा?

छगन भुजबळ सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना जारी करण्यात आलेल्या विविध कंत्राटामधून भुजबळ कुटुंबीयांच्या कंपन्यांना रोख रक्कम लाचेच्या स्वरुपात मिळाल्याचा आरोप होता. महाराष्ट्र सदन व इंडिया बुल्स प्रकरणात राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने स्वतंत्र गुन्हे दाखल केल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने भुजबळांविरोधात काळा पैसा प्रतिबंधक कायदान्वये दोन गुन्हे दाखल केले होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT