Mumbai Crime सुरज सावंत
महाराष्ट्र

फार्मसी प्रवेशाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची फसवणूक; महाविद्यालयाच्या प्राध्यापकाला अटक

मुंबईमधील कुरार पोलीस स्टेशनमधील पोलिसांनी संजय दुबे नावाच्या प्राध्यापकाला अटक करण्यात आली

सुरज सावंत

मुंबई: मुंबईमधील (Mumbai) कुरार पोलीस स्टेशनमधील पोलिसांनी संजय दुबे नावाच्या प्राध्यापकाला अटक करण्यात आली आहे. या प्राध्यापकाने २४ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना डी फार्मसीला अॅडमिशन देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांची फसवणूक (Cheating) केली. हा शिक्षक आर. के. कॉलेजमध्ये शिकवत आहे. तसेच त्याचे क्रांती नगर येथे एक मेडिकल सेंटर देखील आहे. हा प्राध्यापक कॉलेजमध्ये फार्मसीचा (pharmacy) अभ्यासक्रम मुलांना शिकवत असतो. आरोपी हा प्राध्यापक अॅडमिशनचे आश्वासन देऊन विद्यार्थ्यांकडून लाखो रूपये उकळत होता.

हे देखील पहा-

एका विद्यार्थ्याकडून (student) या प्राध्यापकाने तब्ब्ल २ लाख १० हजार घेतले होते तर दुसऱ्याकडून याने ७० हजार घेतले आहे. ज्यामध्ये ६० हजार हे त्या शिक्षकाचे कमिशन म्हणून होते. सध्या अटकेत असलेल्या या प्राध्यापकाची पोलीस (Police) कसून चौकशी करत आहेत. आरोपी शिक्षकाने मुंबई (Mumbai) बरोबरच मुंबईबाहेरील विद्यार्थ्यांची देखील चांगलीच फसवणूक केली आहे. कुरार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असणाऱ्या क्रांती नगर परिसरातील रहिवासी आशीष सरोज जैसवालला RK कॉलेजमधून फार्मसीचा कोर्स करायचा होता. पण अशीष ला कमी गुण मिळाले होते.

यामुळे त्याला अॅडमिशन मिळाले नाही. त्यानंतर आशीषने RK कॉलेजमधील प्राध्यापक संजय केशव दुबेची भेट घेतली. संजयने आशीषला फार्मसीला प्रवेश देतो, असे आश्वासन दिले होते. यानंतर संजयने आशीषला १ लाख ७० हजार आणि कॉलेजच्या डिग्रीची ऑरीजनल कॉपी मागितली होती. त्यानंतर आशीषने मार्च २०२० मध्ये पूर्ण पैसे आणि कॉलेजची डिग्री संजयला दिली आहे. २०२१ मध्ये संजयाने आशीषला सांगितले, बंगळुरू येथील सूर्या कॉलेजमध्ये त्याचे अॅडमिशन झाले आहे. पण या कॉलेजची २ वर्ष एकही परीक्षा झाली नाही.

यामुळे आशीषला त्याची फसवणूक झाली आहे, अशी शंका आली. कुरार पोलीस स्टेशनच्या टीमने आशीष आणि इतर काही विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर संजय दुबेला अटक करण्यात आली आहे. संजयने पोलिसांना सांगितले आहे की, त्याने प्रत्येक विद्यार्थ्याकडून पैसे आणि ओरिजनल सर्टिफिकेट घेतले आहेत, त्याला या कामाचे ६० हजार कमिशन मिळत होते. फसवणुकचा गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीला बोरिवली न्यायालयात हजर होण्यास सांगण्यात आले आहे. यानंतर न्यायालयाने त्याला २५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: फेब्रुवारीचे ₹१५०० खात्यात जमा; एप्रिल महिना उजडला, लाडकीला मार्च महिन्याचे पैसे कधी मिळणार?

Maharashtra Live News Update: वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर पुणे पोलिसांकडून पुन्हा मोठी कारवाई

Sabja Badam Milk Recipe: उन्हाळ्यात घरच्या घरी करा फालूदा सारखा टेस्टी आणि रिफ्रेशिंग सब्जा बदाम मिक्ल

Riteish Deshmukh - Raja Shivaji : "जबरदस्त भाऊ, सरळ हृदयात..." ; 'राजा शिवाजी'ला पाहून अंगावर काटा येईल | VIDEO

Summer Skin Care Tips: उन्हात बाहेर जाण्यापूर्वी चेहऱ्याला लावा 'या' ५ गोष्टी; त्वचा काळी पडणार नाही

SCROLL FOR NEXT