Facebook वरील ओळखीतून शारीरिक संबंध प्रस्थापित करून तरुणीची फसवणूक! Saamtv
महाराष्ट्र

Facebook वरील ओळखीतून शारीरिक संबंध प्रस्थापित करून तरुणीची फसवणूक!

पिडीत युवती फेसबुक फ्रेंडला भेटण्यासाठी नागपूरला आली. ती तीन दिवस नागपुरातील सेंट्रल एव्हेन्यूच्या हॉटेल ओरिएंट मध्ये आरोपी सोबत मुक्कामी राहिली. दरम्यान, या तीन दिवसाच्या कालावधीत आरोपीने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मंगेश मोहिते

नागपूर : एका तरुण-तरुणीची फेसबुक (Facebook) वरून ओळख झाली, त्यानंतर चॅटिंग करून प्रेम संबंध निर्माण झाले. लग्नाचे आमिष दाखवत तरुणीशी शारीरिक संबंध ठेवून पीडितेला धोका दिल्याची घटना नागपुरात (Nagpur) समोर आली आहे. तरुणीने दाखल केलेल्या पोलीस तक्रारीनुसार ही घटना नागपूरच्या गणेशपेठ पोलीस स्टेशन च्या हद्दीत घडली आहे.

हे देखील पहा :

सविस्तर माहिती अशी, भंडाऱ्यातील (Bhandara) एका २१ वर्षीय युवतीची फेसबुकच्या माध्यमातून समाधान रामचंद्र पवार (कामोठे, नवी मुंबई) नामक युवकाशी ओळख झाली. या ओळखीतून बऱ्याच दिवस त्यांनी एकमेकांशी चॅटिंग केली. चॅटिंग नंतर आरोपी समाधान पवार याने तरुणीला भेटण्यासाठी नागपूरला बोलावले.

23 सप्टेंबर 2020 रोजी सदर युवती मुंबईहून (Mumbai) आलेल्या समाधान पवार याला भेटण्यासाठी नागपूरला आली. ती तीन दिवस नागपुरातील सेंट्रल एव्हेन्यूच्या हॉटेल ओरिएंट मध्ये आरोपी सोबत मुक्कामी राहिली. दरम्यान, या तीन दिवसाच्या कालावधीत आरोपीने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तो मुंबई ला निघून गेला.

शारीरिक संबंधानंतर विद्यार्थीनीने समाधान यास लग्नाची गळ घातली असता तो पीडितेला टाळत होता. आरोपीने लग्नास नकार दिला त्यामुळे विद्यार्थिनीने भंडारा आणि नागपूरच्या गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. सदर प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरू आहे. मात्र, सोशल मिडियाच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तीशी ओळख किती धोकादायक ठरू शकते याचे सदर प्रकरण उत्तम उदाहरण मानावे लागेल.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनिषा मांढरेंचे मॉडर्न महाविद्यालयातून निलंबन

LPG Gas Booking : सिलेंडरच्या बुकिंगचा मेसेज आलाय, पण DAC कोड खरा आहे की खोटा? कसं ओळखाल?

अनैतिक संबंधातून वहिनीला संपवलं, नंतर नेपाळमध्ये पलायन करण्याचं ठरवलं अन् कल्याण पोलिसांचा झारखंडमध्ये अटकेचा थरार

कल्याणमध्ये 5 भटक्या कुत्र्यांची निर्घृण हत्या; मृतदेह नाल्यात फेकल्याचा संतापजनक प्रकार

सत्ताधारी महिला आमदाराच्या ताफ्यावर हल्ला; भररस्त्यात गाडी अडवत केली जातीवाचक शिवीगाळ, सुरक्षा रक्षकांना मारलं

SCROLL FOR NEXT