latur  Saam tv
महाराष्ट्र

latur Fight : सुनील तटकरेंच्या पत्रकार परिषदेत मोठा राडा; छावा आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची तुफान हाणामारी,VIDEO

latur Fight News : सुनील तटकरेंच्या पत्रकार परिषदेत मोठा राडा झालाय. छावा आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची तुफान हाणामारी झालीये.

Vishal Gangurde

संदिप भोसले, साम टीव्ही

लातूर : लातुरात मोठा राडा झाला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेमध्ये मोठा गोंधळ झाला. या पत्रकार परिषदेत छावा संघटना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची तुफान हाणामारी झाली आहे.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या पत्ते खेळत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरून विरोधकांनी रान उठवलं आहे. कृषिमंत्री कोकाटे यांच्या विधीमंडळातील व्हिडिओवरून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली जात आहे. कृषिमंत्री कोकाटे यांच्या कृत्याच्या विरोधात छावा संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. लातूर दौऱ्यावर असलेल्या सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कृषिमंत्र्यांचा निषेध नोंदवला.

सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत कृषीमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावेळी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तटकरे यांना निवेदन दिलं. त्यानंतर सुनील तटकरे यांच्या अंगावर पत्ते उधळून कृषीमंत्र्यांचा निषेध केला. यावेळी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कृषिमंत्र्यांच्यां राजीनाम्याची मागणी केली.

छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पत्ते उधळल्यानंतर पत्रकार परिषदेत एकाच गोंधळ उडाला. यावेळी अजित पवार गटाचे कार्यकर्ते आणि छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे. अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली. यावेळी कार्यकर्त्यांनी खुर्च्याची देखील फेकाफेक केली.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी विधीमंडळाच्या लॉबीमध्ये जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली होती. या हाणामारीनंतर एकच खळबळ उडाली होती. या हाणामारीवरून चहुबाजूंनी टीका करण्यात आली होती. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसहित विरोधकांनी हाणामारीच्या घटनेचा निषेध केला होता. त्यानंतर आता लातुरातही दोन संघटनेचे कार्यकर्ते भिडले आहेत. यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचं बोललं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT