Aurangabad News नवनीत तापडिया
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्याच्या दौऱ्याआधीच औरंगाबाद विद्यापीठात गोंधळ; सत्तारांसमोर भाजपचा बॅनर फाडण्याचा प्रयत्न

सोहळ्याची पूर्व तयारी पाहण्यासाठी विद्यापीठात आलेले कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासमोरच विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी केली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवनीत तापडिया -

औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते आज संध्याकाळी पाच वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Shivaji Maharaj) स्मारकांचे अनावर होणार आहे.

मात्र, त्यापूर्वीच मंत्री अतुल सावे यांनी विद्यापीठ प्रांगणात कमळ चिन्ह असलेले बॅनर लावले या बॅनरवरून विद्यार्थी संघटना संतप्त झाले असल्याचे पाहायला मिळालं आहे. सोहळ्याची पूर्व तयारी पाहण्यासाठी विद्यापीठात आलेले कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यासमोरच विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी केली. तरी देखील बॅनर न काढल्याने आक्रमक विद्यार्थ्यांनी अतुल सावे यांचा बॅनर फाडण्याचा प्रयत्न केला. वेळीच पोलिसांनी धावं घेत सर्व पदाधिकाऱ्यांना तब्यात घेतल्यामुळे प्रकरण शांत झालं.

पाहा व्हिडीओ -

दरम्यान, या प्रतकरणाविषयी विचारले असता, जे नियमात असेल त्याप्रमाणे कायदेशीर प्रक्रिया व्हावी. सामाजिक विषयात राजकारण नको अशी प्रतिक्रिया मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. त्यामुळे आता शैक्षणिक संस्थांच्या कार्यक्रमांमध्ये देखील एका विशिष्ट पक्षाची बॅनरबाजी करण्याची गरज काय असा सवाल विद्यार्थी संघटनांकडून करण्यात येत आहे. शिवाय मुख्यमंत्र्य़ांच्या दौऱ्याआधीच विद्यार्थ्यांनी केलेल्या या गोंधळामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ झाल्याचं पाहायला मिळालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत संभाजीनगरमध्ये आंदोलन

Mind Reading Tricks : समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चाललंय? 'या' ७ गोष्टींवरून लगेच ओळखा

ED raid : बड्या माजी मंत्र्याच्या घरावर ED ची छापेमारी; राजकारणात खळबळ, जाणून घ्या काय आहे प्रकरण

Bath After Eating: जेवल्यानंतर लगेच आंघोळ करणं योग्य की अयोग्य? आधी जाणून घ्या शरीरावर होणारे परिणाम

Kaju Katli Recipe: सणासुदीसाठी घरच्या घरी बनवा मऊ आणि चविष्ट काजू बर्फी; वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT