dr babasaheb ambedkar marathwada university saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: मराठवाडा विद्यापीठाच्या नावात औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर बदल; शिंदे सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Politics: शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाने मराठवाडा विद्यापीठाच्या नावात बदल करण्याच्या निर्णयाला मान्यता दिली आहे.

Vishal Gangurde

Maharashtra Political News:

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नावाबाबतीत मोठा निर्णय घेतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नावात औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर असा बदल करण्यास येणार आहे. या बदल करण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री शिंदे होते. (Latest Marathi News)

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाने मराठवाडा विद्यापीठाच्या नावात बदल करण्याच्या निर्णयाला मान्यता दिली आहे. यामुळे आता विद्यापीठाचे नाव आता 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर' होणार आहे.

या विद्यापीठाच्या नावातील औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर नाव होणार आहे. तर उस्मानाबाद ऐवजी धाराशिव असा बदल करण्यात येणार आहे.

भोसला मिलिटरी स्कूलला नागपुरात जमीन

नाशिक येथील भोसला मिलिटरी स्कूलला नागपुरात जमीन देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाकडून घेण्यात आला. नागपुरातील मौजा चक्कीखापा येथील स.क्र. ६४/१, आराजी २१.१९ हे.आर. ही जमीन ३० वर्षाच्या भाडेपट्टयाने देण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

भोसला मिलिटरी स्कूल हे नाशिक येथील सेंट्रल हिंदू एज्युकेशन सोसायटीमार्फत चालविण्यात येते. या संस्थेस जागा देण्याचा निर्णय झाला आहे. या स्कूलमध्ये भारतीय प्रशासनीक पूर्व सेवा तयारी प्रशिक्षण वर्ग, निवासी सुविधा आणि वरिष्ठ महाविद्यालयासह सुरु करण्यात येईल.

फलटण ते पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग

फलटण ते पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग आता महारेल ऐवजी रेल्वे मंत्रालय करणार आहे. याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. फलटण ते पंढरपूर हा रेल्वेमार्ग तयार करण्यासाठी महारेलने १८४२ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचा अहवाल तयार केला होता. यामध्ये राज्य शासनाचा सहभाग ९२१ कोटी इतका आहे. सरकार हा निधी टप्प्याटप्याने उपलब्ध करून देणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ऑपरेशन सिंदूर सायबर हल्ला प्रकरणी जुन्नरमध्ये NIAची धाड

8th Pay Commission: २.१ फिटमेंट फॅक्टरने पगार किती वाढणार? ₹१८,००० वरून ₹३८,००० होणार?

साखर महाग झाली म्हणून खायची बंद केली तर शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या साखर न खाण्याचे तोटे

Marathi Actor : स्वत:च्याच मृत्यूची खोटी बातमी पाहताच प्रसिद्ध मराठी अभिनेता भडकला; थेट VIDEO शेअर करत म्हणाला- "एवढी कसली घाई..."

Sugar price hike: एका महिन्यात साखर तब्बल २९ टक्क्यांनी महागली, आता केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; काय आहे नवा नियम?

SCROLL FOR NEXT