चंद्रशेखर बावनकुळे Saam TV
महाराष्ट्र

चंद्रशेखर बावनकुळे 'त्या' आरोपकर्त्यावर ठोकणार 50 कोटींचा अब्रु नुकसानीचा दावा! (Video)

माजी ऊर्जामंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे नागपुरातील वकील सतीश उके यांच्यावर 50 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकणार आहेत.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

संजय डाफ

नागपूर : माजी ऊर्जामंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे नागपुरातील वकील सतीश उके यांच्यावर 50 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकणार आहेत. सतीश उके यांनी पत्रकार परिषद घेत बावनकुळे यांच्याकडे कोट्यवधी रुपयांचा काळा पैसा असल्याचा आरोप केला होता. तसंच बावनकुळे यांचे नातेवाईक असलेल्या सुरज तातोडे यांना सोबत आणून बावनकुळे यांनी ऊर्जामंत्री असताना असे आणि किती काळा पैसा घेतला याचा पाढा वाचून दाखविला होता. (Chandrashekhar Bawankule News)

मात्र, हे सर्व आरोप निराधार असून राजकीय षडयंत्र रचून आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केलाय. विधान परिषदेच्या निवडणुकीत प्रतिज्ञापत्रात आपण आपल्या संपत्तीची सर्व माहिती दिली आहे. मात्र, कुणाच्या घरात कलह निर्माण करायचा, नातेवाइकाला पकडायचे, भडकवायचे आणि खोटेनाटे आरोप करायचे, हे काम सतीश उके यांनी केलं आहे. त्यामुळं यांच्यावर ५० कोटी रुपयांच्या अब्रू नुकसानीचा दावा करणार आणि फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचं बावनकुळे सांगितलंय.

काय होता बावनकुळेंनवर आरोप?

सुरज तातोडे यांनी आरोप केला होता की, चंद्रशेखर बावनकुळे ऊर्जामंत्री असताना सुरज हे त्यांच्या नागपूर आणि मुंबईतील (Nagpur And Mumbai) बंगल्यावर काम करायचे. कंत्राटदारांकडून मिळालेले भ्रष्टाचाराचे पैसे बावनकुळे सुरज तातोडे यांच्याकडे द्यायचे. दोन वर्षात अंदाजे 100 कोटी काळा पैसा बावनकुळे यांनी ठेवायला दिले, असा दावा तातोडे यांनी केला. एसजी इन्फ्रा, KKC, सरस्वती कन्ट्रक्शन या कंपन्याकडून बावनकुळे यांनी पैसे घेतले, असा आरोपही त्यांनी केला होता.

पहा व्हिडीओ-

तसेच, काळ्या पैशाच्या हिशोबात घोटाळा केल्याचा आरोप बावनकुळे यांनी सुरज तातोडे यांच्यावर केला होता. 30 लाख रुपये दिले नाही म्हणून त्यांना कामावरून काढून टाकले. त्यांच्या नावावर असलेले नागपुरातील 5 फ्लॅट, 4 कार आणि एका कंपनीतील शेअर्स बावनकुळे यांनी जबरदस्तीने आपल्या नावावर केल्याचा आरोपही तातोडे यांनी केला. सततच्या धमक्या आणी टेन्शन मुळं तातोडे यांना ब्रेन हॅमरेज झाला. त्यातून ते बचावले, मात्र नैराश्याने ते खचले आणि शेवटी ऍड. उके यांच्याकडे आल्याचं त्यांनी सांगितलं होत.

ऍड. उके यांनी बावनकुळे हे आज पाच हजार कोटी रुपयांचे मालक आहे. ज्या प्रमाणे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या वर आरोप झाले आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन खटला चालविला जातोय त्याच पद्धतीने बावनकुळे यांच्या विरोधात साक्षीदार आरोप करतोय, त्यामुळं त्यांच्यावर गुन्हा दाखल त्यांच्या चौकशी केली जावी, अशी मागणी ऍड. उके यांनी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: स्वच्छ आणि ग्लोईंग त्वचेसाठी आठवड्यातून २ वेळा लावा घरी बनवलेला हा फेसपॅक

Mango Ice Cream : रात्री आईस्क्रीम खाण्याची खूप इच्छा होते, मग घरीच बनवा टेस्टी मँगो आईस्क्रीम

Summer Sunscreen Using Tips: सनस्क्रीन लावताना तुम्हीही 'या' चुका करताय का? जाणून घ्या उन्हाळ्यात सनस्क्रिन कशी लावायची?

LPG Shortage: गॅसचा तुटवडा; रेल्वेतील खाद्यसेवा बंद| VIDEO

Maharashtra Live News Update: गॅस दरवढीच्या विरोधात सोलापुरात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

SCROLL FOR NEXT