Chandrashekhar Bawankule, Uddhav Thackeray,  saam tv
महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray: 'सत्तेवर असताना मंदिरं बंद ठेवून...'; चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Maharashtra Politics News: उद्धव ठाकरेंच्या या विदर्भ दौऱ्यावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीकास्त्र सोडलं आहे.

Ruchika Jadhav

Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. पक्षबांधणीसाठी उद्धव ठाकरेंचा हा दौरा असल्याचं म्हटलं जातंय. आजपासून उद्धव ठाकरे यांचा विदर्भ दौरा सुरू झालाय. उद्धव ठाकरेंच्या या विदर्भ दौऱ्यावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीकास्त्र सोडलं आहे.(Latest Marathi News)

सत्ता असताना अडीच वर्षांत अडीच दिवस मंत्रालयात जाण्यासाठी ज्यांना वेळ मिळाला नाही ते उद्धव ठाकरे आता तब्बल दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंना कधीही विदर्भातील जनतेची आठवण झाली नाही; आता मात्र विदर्भाचा पुळका आलेला दिसतोय, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलीये.

आपल्या ट्वीटर अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत त्यांनी लिहिलं आहे की, सत्तेवर असताना मंदिरं बंद ठेवून मदिरालय सुरू करणाऱ्या उद्धव ठाकरेंना आता मंदिरांत दर्शनासाठी जावं लागतंय. उद्धव ठाकरे आता तुम्ही कितीही दौरे केले तरी तुमचे ढोंगी राजकारण आणि सत्ता गेल्यामुळे सुरू असलेली नौटंकी जनता ओळखून आहे, अशा शब्दांत चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय.

तसेच उद्धव ठाकरे तुम्ही विदर्भाच्या दौऱ्यावर आलाच आहात तर भाजपसोबत गद्दारी करून,स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व सोडून तुम्हाला काय मिळालं हेही एकदा जनतेला सांगून टाका, असंही बावनकुळेंनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bride Useful Things: नव्या नवरीच्या कपाटात असायला हव्यात 'या' महत्वाच्या गोष्टी

Andheri-Bandra: अंधेरी ते वांद्रे १५ डब्ब्यांची लोकल धावणार; कधीपासून होणार सुरु?

MNREGA Scheme: मोठी बातमी! मनरेगा योजनेचे नाव बदलणार, मोदी सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

Hair Spry Side Effect: सतत केसांवर हेअर स्प्रे लावल्याने केसांना होतात 'हे' नुकसान

Car Vastu Tips: नकारात्मक शक्ती दूर ठेवण्यासाठी कारमध्ये ठेवा 'या' ५ वस्तू, प्रवास होईल सुखाचा

SCROLL FOR NEXT