satara, udayanraje bhosale, chandrashekhar bawankule, jaykumar gore saam tv
महाराष्ट्र

अफजल खान कबरीचे अतिक्रमण हटवलं; साताऱ्याला येतोय.. उद्या भेटू, भाजपचा माेठा नेता उदयनराजेंच्या भेटीला

आज साता-यात भाजपच्यावतीने पत्रकार परिषद घेतली जाणार आहे.

ओंकार कदम, Siddharth Latkar

Satara News : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) हे साता-यात (satara) दाखल झाले आहेत. बावनकुळे यांनी खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale) यांची त्यांच्या जलमंदिर पॅलेस येथे भेट घेतली. प्रतापगडावरील अफजल खानच्या कबरीनजीकचे अतिक्रमण शिवप्रताप दिनी सातारा प्रशासनाने पाडण्यास प्रारंभ केला. त्यानंतर बावनकुळे यांनी गुरुवारी ट्विट करुन उद्या साता-याला येताेय भेटू असे म्हटले हाेते. (Satara Latest Marathi News)

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आज पासून सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. या दरम्यान खासदार उदयनराजे (udayanraje bhosale) आणि आमदार शिवेंद्रराजे यांची ते भेट घेणार आहेत. बावनकुळे यांच्या स्वागतासाठी भाजप जिल्हाध्यक्ष जयकुमार गाेरे यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते माेठ्या संख्येने उपस्थित आहेत. (Maharashtra News)

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जलमंदिर पॅलेस येथे खासदार उदयनराजे भाेसले यांची भेट घेतली. यावेळी उदयनराजेंनी त्यांचे स्वागत केले. दाेन्ही नेत्यांमध्ये सध्या चर्चा सुरु आहे. त्यानंतर बावनकुळे हे आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या (shivendraraje bhosale) भेटीसाठी सुरुची बंगला येथे जाणार आहेत.

शिवेंद्रसिंहराजे यांच्या भेटीनंतर बावनकुळे हे राजेंनी आयाेजिलेल्या दुचाकी रॅलीत सहभागी हाेणार आहेत. ही रॅली राजवाडा (गांधी मैदान) ते जिल्हा परिषद अशी काढण्यात येणार आहे. दरम्यान गुरुवारी प्रतापगडावरील अफजल खान कबरीनजीकचे अतिक्रमण प्रशासनाने काढण्यास प्रारंभ केला. त्यावेळी बावकुऴे यांनी ट्विट करुन उद्या साता-यात (satara) भेटू असे म्हटले हाेते. आज ते साता-यात आले असून पत्रकारांशी संवाद साधताना काेणती माेठी गाेष्ट उघडकीस करणार आहेत याची उत्सुकता जनतेला लागून राहिली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Upvas: आषाढी एकादशीला जास्त मेहनत न घेता घरीच बनवा हे ६ सोपे पदार्थ

Hruta Durgule : महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे सध्या काय करते ?

Jalebi Recipe: घरी आलेल्या पाहुण्यांसाठी ३० मिनिटात बनवा खमंग जिलेबी, नोट करा रेसिपी

Sushil Kedia : आम्ही जर आमच्या औकातीवर उतरलो तर...; दुसऱ्यांदा ट्वीट करत सुशील केडिया यांची राज ठाकरेंना धमकी

Vengurla Tourism: समुद्राची शांतता, किल्ल्यांचा इतिहास, मंदिरांची भक्ती... हे सगळं एकाच ट्रिपमध्ये पाहायचंय? मग बॅग भरा आणि चला वेंगुर्ल्याला!

SCROLL FOR NEXT