Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदासाठी कटोरा घेऊन फिरत आहेत; बावनकुळेंची बोचरी टीका

Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray: मुख्यमंत्रीपदावरून चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

Satish Kengar

चेतन व्यास, साम टीव्ही, प्रतिनिधी

राज्यात विधानसभा निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. यातच महाविकास आघाडी आणि महायुतीतील पक्षांचे अद्याप जागावाटप निश्चित झालेलं नाही. याचदरम्यान, ठाकरे गटाचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मविआने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा आणि निवडणुकीला सामोरे, जावं असं म्हटलं होतं. तर अलीकडेच संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे हेच महाराष्टातील जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं वक्तव्य केलं होतं. यावरूनच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घणाघाती टीका केली आहे.

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत की, ''उद्धव ठाकरे कटोरा घेऊन फिरत आहेत, मला मुख्यमंत्री करा, मला मुख्यमंत्री करा, काँग्रेसकडे जातं आहे, शरद पवार कडे जातं आहे.'' ते म्हणाले, ''काँग्रेसकडे नाना पटोले यांच्या सारखे दहा नेते तयार झाले आहेत. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी चढाओढ सुरु आहे.''

'डबल इंजिन सरकार आलं पाहिजे'

बावनकुळे म्हणाले की, ''आपल्याकडे डबल इंजिन सरकार आलं पाहिजे. 2029 पर्यंत केंद्रात मोदींचे सरकार आहे आणि राज्यातलं सरकार एका विचारचं आलं आणि दोन्ही सरकार एका विचाराचे आले, तर महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला फायदा होऊ शकतो. म्हणून महाराष्ट्रात डबल इंजिनच महायुतीचं सरकार पाहिजे.''

ते म्हणाले, ''दिल्लीत मोदीजी यांचे सरकार आहे आणि त्याचा पूर्ण फायदा महाराष्ट्राला झाला पाहिजे. म्हणून राज्यात सरकार महायुतीचे सरकार येणं गरजेचं आहे. जर महाविकास आघाडीला चुकून मत दिलं आणि सरकार महाविकास आघाडीच आलं, तर जसं उद्धव ठाकरे यांनी पंधरा योजना बंद केल्या होत्या त्यांच्याकाळात, त्यांनी तर पंतप्रधान आवास योजना सुद्धा बंद केली होती.

चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले, ''पुन्हा महाविकास आघाडीच सरकार आलं तर ते केंद्र सरकारचे कोणतेही सपोर्ट घेणार नाही. मोदींनी राज्याला कितीही म्हटलं की, हे घ्या ते घ्या, पण ते घेणार नाही. कारण मोदींचं होईल. महाविकास आघाडीचे लोक योजना नाकारतील. यामुळे डबल इंजिन सरकार हे आमची प्राथमिकता असून मुख्यमंत्रीपद हे महाविकास आघाडीची प्राथमिकता आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : भोंदू अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखल

Success Story: १०वी-१२वीत टॉपर; एकदा नव्हे तर दोनदा UPSC क्रॅक; IFS आदिती यांचा प्रेरणादायी प्रवास

Nashik Accident: दिंडोरीत भीषण अपघात; कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा मृत्यू

किडनी विकणाऱ्या शेतकऱ्याला हवं इच्छामरण; जीवंतपणीच्या मरणयातना कधी थांबणार? VIDEO

शिवसेनेच्या इतिहासावरून नाईकांचा शिंदेंना अप्रत्यक्षपणे टोला; एकनाथ शिंदे आणि गणेश नाईकांचा वाद पुन्हा पेटणार?

SCROLL FOR NEXT