satara, chandrashekhar bawankule, sharad pawar
satara, chandrashekhar bawankule, sharad pawar saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : शरद पवार जादुटोणा करणारे भोंदुबाबा; टीका करताना चंद्रशेखर बावनकुळे हे काय बोलून गेले

ओंकार कदम

Chandrashekhar Bawankule News : शरद पवार हेच राष्ट्रवादीतील भोंदुबाबा आहेत. उद्धव ठाकरेंना जादुटोणा करुन ठाकरेंना जाळ्यात ओढलं अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्यांवर केली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष जयकुमार गाेरे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले आदी उपस्थित हाेते. (chandrashekhar bawankule latest marathi news)

भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्यावर जोरदार टिका करत शरद पवार यांना टोमना मारला. ते म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरे यांच्यावर जादुटोणा केला. यामुळे उद्धव ठाकरे त्यांच्या प्रमाणे विचार करायला लागले आहेत.

या पक्षातील भोंदुबाबाच्या ताब्यात कोणं आलं तर तो सुटत नाही असं सांगत शरद पवारांच्या नावाचा उल्लेख करत त्यांच्या ताब्यात कोणी आलं तर सुटत नाही अशी टिका भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केली.

राष्ट्रवादीच्या (ncp) जयंत पाटील यांनी सत्तेच स्वप्न सोडुन दिलं पाहिजे असेही ते म्हणाले. जयंतरावांनी काळजी करु नये आम्ही पुन्हा सत्तेत येऊ देणार नाही. आमचे २०० आमदार पुढच्या निवडणुकीत निवडुन येतील असं विधान सुद्धा चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar Water Shortage : नंदुरबार शहरावर पाणी कपातीची टांगती तलवार; विरचक धरणातील पाणीसाठा घटला

Today's Marathi News Live : सांगलीत कॉफी शॉप तोडफोड प्रकरणी १६ जण ताब्यात

Swati Maliwal Assault Case: स्वाती मालीवाल मारहाण प्रकरण, संशयित आरोपी बिभव कुमार घरातून गायब

Wedding Viral Video: बापरे! भर मंडपात नवरा-नवरीची हाणामारी; VIDEO होतोय व्हायरल

Jamner Crime : नशेत मुलाने केला पित्याचा खून; दारूसाठी पैसे देण्यास वडिलांनी नकार दिल्याने कृत्य

SCROLL FOR NEXT