Chandrashekhar Bawankule  Saam TV
महाराष्ट्र

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...,

चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे भाजप प्रदेशाध्यपदाची धुरा सोपावण्यात आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा पहिल्या टप्प्याचा विस्तार पार पडल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलून गेली आहे. चंद्रकांत पाटील यांना शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर भाजपचे (BJP) नवीन प्रदेशाध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. आज भाजपने चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद सोपावलं आहे. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष पदी वर्णी लागताच बावनकुळेंनी यांनी लोकसभा आणि विधानसभेतलं टार्गेटही सांगून टाकलंय. (Chandrashekhar Bawankule Marathi News)

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?

भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लोकसभा तसेच विधानसभेबाबत आपलं गणितंही सांगितलं. लोकसभेमध्ये भाजप आणि शिवसेना मिळून ४५ पेक्षा जास्त जागा आणि विधानसभेमध्ये २०० पेक्षा जास्त जागा निवडून आणणार असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

मोदी, शाह, फडणवीसांचे मानले आभार

प्रदेशाध्यपदी निवड झाल्यानंतर बावनकुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. बावनकुळे म्हणाले की, 'मी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी देवेंद्र फडणवीस साहेब, चंद्रकांतदादा पाटील आणि महाराष्ट्रातील सर्व भाजप कार्यकर्त्यांचे आभार मानतो'. (Chandrashekhar Bawankule Todays News)

'माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर एवढी मोठी जबाबदारी दिली. या जबाबदारीतनं मी भाजपला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल. महाराष्ट्रामध्ये भाजप अजून नंबर एक कसा करता येईल, अजून त्याला आपल्या पक्षाला प्रचंड मोठं कसं करता येईल, हे पाहायचं आहे', असे म्हणत बावनकुळेंनी आभार मानलेत.

आशिष शेलार मुंबई भाजप अध्यक्ष

दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत भाजपने आशिष शेलार यांच्या गळ्यात मुंबईच्या प्रदेशाध्यपदाची माळ टाकली. आशिष शेलार हे मुंबई भाजपचे तगडे नेते मानले जातात. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत मुंबई महापालिका जिंकण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.

गेल्या काही दिवसात मुंबईच्या अनेक भागात पोलखोल यात्रेच्या माध्यमातून शेलार हे शिवसेनेला वारंवार धारेवर धरत आहेत. त्याचा फायदा त्यांना निवडणुकीत होण्याची दाट शक्यता आहे. तर जातीय समीकरण आणि इतर बाबी लक्षात घेऊन बावनकुळेंकडे राज्याची धुरा सोपवण्यात आली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vice President: चर्चा ६ नावांची; वर्णी मात्र महाराष्ट्राच्या राज्यपालांची, राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यामागे काय आहे भाजपचा राजकीय डाव?

Hair Care Tips: केसांना दही लावल्याने होतात 'हे' भन्नाट फायदे

Video : तेरे जैसा यार कहाँ... गाणं म्हणणारे तहसीलदार निलंबित, निरोप समारंभाची पोस्ट पडली महागात

Maharashtra Politics : शिंदेसेनेला हादरा, नाराज नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत

Horoscope Monday : सोमवार ठरणार भाग्याचा, रखडलेली कामे होणार पूर्ण; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT