Chandrapur News Saam tv
महाराष्ट्र

Chandrapur News : अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपमध्ये दाखल; उमेदवारीही निश्चित

Chandrapur News : मागील काही दिवसांपासून आमदार किशोर जोरगेवार हे प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करीत होते

संजय तुमराम

चंद्रपूर : चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी आज भाजपमध्ये अधिकृत प्रवेश घेतला. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला. त्यामुळे आता जोरगेवार यांना चंद्रपुरातून भाजपची उमेदवारी निश्चित झाल्याचे मानले जात आहे. 

मागील काही दिवसांपासून आमदार किशोर जोरगेवार हे प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करीत होते. या अनुषंगाने ते शरद पवार यांच्या भेटीला देखील गेले होते. पण तेथे त्यांना प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी (BJP) भाजपची वाट धरली. यात भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी त्यांना भक्कम पाठबळ दिले. त्यामुळे (Sudhir Mungantiwar) मुनगंटीवार यांची इच्छा नसतानाही जोरगेवार यांना पक्षात प्रवेश देण्याचे आदेश पक्षाने दिले आणि त्या आदेशावर मुनगंटीवार यांनी आज अंमल केला. 

मुनगंटीवार समर्थकांमध्ये असंतोष 

मुनगंटीवार यांनी जोरगेवार यांच्या नावाला मोठा विरोध केला. पण पक्षाच्या निर्णयामुळे त्यांना माघार घ्यावी लागली. यामुळे मुनगंटीवार समर्थकांमध्ये मोठा असंतोष पसरला आहे. असे असले तरी (Chandrapur) चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून जोरगेवार यांना भाजपची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारतावर संसर्गजन्य कॅन्सरचं संकट, 23 लाख रुग्णांना व्हायरल कॅन्सर

लाडकी बहीण योजनेवर टांगती तलवार? महिलांचं टेंन्शन वाढलं

सुनिल तटकरेंना कोण करतंय टार्गेट? बड्या नेत्याच्या विधानाने राष्ट्रवादीच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

ऐन सणासुदीत टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशिन महागलं; गॅसचा भडका, टोलच्या दरातही वाढ

पुणे शिक्षक मतदारांच्या यादीत अजब घोळ, मतदाराचं नाव 'बॉम्बस्फोट', वडिलांचं नाव 'बॉम्ब'

SCROLL FOR NEXT