अंघोळीसाठी नदीत उतरला; मात्र परत आलाच नाही! SaamTVNews
महाराष्ट्र

अंघोळीसाठी नदीत उतरला; मात्र परत आलाच नाही!

अभिनव आपल्या आईसह आरमोरी येथून नदीघाट पुलाजवळ वैनगंगा नदीपात्रात आंघोळ करायला आला होता.

संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी-आरमोरी मुख्य महामार्गावर असलेल्या नदीघाट पुलाजवळील वैनगंगा नदी (Wainganga River) पात्रात बुडून (Drown) युवकाचा मृत्यु झाला आहे. अभिनव दौलतराव कुथे (२३) असे मृत मुलाचे नाव असून, तो आरमोरी येथील रहिवासी आहे.

हे देखील पहा :

अभिनव आपल्या आईसह आरमोरी येथून नदीघाट पुलाजवळ वैनगंगा नदीपात्रात आंघोळ (Bath) करायला आला होता. आई सुद्धा नदी पात्रात थोड्या पाण्यात (Water) उभी होती. मुलगा अभिनव हा खोल पाण्यात पोहायला गेला. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने अभिनव काही क्षणातच पात्रात दिसेनासा झाला. यासंबंधी पोलिसांना घटनेची माहिती दिली गेली असून आपत्ती व्यवस्थापन दल सदस्यांसह यंत्रणांनी प्राथमिक शोध मोहीम सुरू केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price Today: स्वस्त झाल्यानंतर सोन्याचे भाव आज पुन्हा वाढले; पाहा किती आहे 24 कॅरेटचा भाव?

New Marathi Movie: प्रथमेश परब आणि शशांक शेंडेचा 'श्री गणेशा' लवकरच; चित्रपट या दिवशी होणार रिलीज

Maharashtra News Live Updates: छत्तीसगडमध्ये चकमक, ५ नक्षलवाद्यांचा खात्मा

IND vs SA: भारत - दक्षिण आफ्रिका सामन्यात पडला रेकॉर्ड्सचा पाऊस; संजू- तिलकने मोडून काढले हे मोठे रेकॉर्ड्स

Escalator In Marathi: एस्कलेटरला मराठीत काय म्हणतात?

SCROLL FOR NEXT