chandrapur saam tv
महाराष्ट्र

Chandrapur Crime News : रुग्णाच्या नातेवाईकाकडून डाॅक्टरांना मारहाण, चंद्रपूरात दाेघांना अटक

या घटनेनंतर रुग्णालयातील कर्मचारी त्यांच्या सुरक्षेची मागणी करु लागले आहेत.

संजय तुमराम

Chandrapur Crime News : चंद्रपूर जिल्ह्यात वैदयकीय अधिकारी यांना मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकारानंतर पाेलीसांनी दाेघांना अटक केली आहे. दरम्यान वैद्यकीय अधिकारी यांच्यावर सातत्याने हल्ला हाेत असल्याने वैद्यकीय संघटना देखील आता पुन्हा एकदा आक्रमक हाेण्याची शक्यता आहे. (Maharashtra News)

पाेलीसांनी दिलेल्या माहितीनूसार चंद्रपूर मेडिकल कॉलेजमध्ये हा प्रकार घडला. काल रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. एका डॉक्टरला नातेवाईकांकडून मारहाण करण्यात आली. ही घटना सीसीटीव्हीत (cctv camera) कैद झाली आहे. डाक्टरांना मारहाण करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे असेही पाेलीसांनी नमूद केले.

दरम्यान सहा महिन्यांपूर्वी असाच एक हल्ला याच शासकीय रुग्णालयात झाला होता. तेव्हा सर्व डॉक्टरांनी बंद पुकारला होता. डीनच्या मध्यस्थीनंतर बंद मागे घेण्यात आला होता. आता पुन्हा तशीच घटना घडल्याने वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, रुग्णालयातील कर्मचारी त्यांच्या सुरक्षेची मागणी करु लागले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित; राज्य सरकारकडून सर्व मागण्या मान्य

Maharashtra News Live Update: पनवेलमध्ये ऑनलाईन सट्टेबाजी रॅकेटवर पोलिसांचा छापा

मोठी दुर्घटना! पाच मजली इमारत कोसळली; सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती

अजित पवार गटाच्या नेत्याकडून महिलेचा विनयभंग; विधवेकडे नगरसेवकानं केली शरीरसुखाची मागणी

सासूसाठी सुनबाई बिबट्याशी भिडली, संकटात नातूनेही दाखवलं धाडस

SCROLL FOR NEXT