Tiger Attack Saam tv
महाराष्ट्र

Tiger Attack : परिवार झोपेत असताना महिलेवर वाघाचा हल्ला; बापलेकाने झुंज देत वाचवले प्राण

परिवार झोपेत असताना महिलेवर वाघाचा हल्ला; बापलेकाने झुंज देत वाचवले प्राण

संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात वाघाने मेंढपाळाच्या कुटुंबावर हल्ला केला. रात्री परिवार झोपेत असताना वाघाने हल्ला (Tiger Attack) चढविला. मात्र वाघाशी झुंज देत कुटुंबाने प्राण वाचविले. ही घटना पोंभुर्णा तालुक्यातील (Chandrapur) घोसरी शेत शिवारात घडली. (Live Marathi News)

नांदगाव येथील हे मेंढपाळ कुटुंब आपल्या मेंढ्या घेऊन घोसरी येथील शेत शिवारात राहुटीला होते. रात्री झोपेत असताना दबा धरून बसलेल्या (Tiger) वाघाने वेणूबाई दुर्किवार या महिलेवर हल्ला केला. बाजूलाच झोपेत असलेल्या पती सुरेश दूरकीवार व मुलगा पंकज दूरकीवार यांनी महिलेला वाचवण्यासाठी वाघाशी झुंज दिली. या प्रतिकारात कुटुंबातील तिघेही जखमी झाले. 

जखमी वाघ दिसला 

विशेष म्हणजे सध्या याच परिसरात एक वाघ जखमी अवस्थेत फिरताना आढळून आला आहे. त्यामुळे मेंढपाळाच्या कुटुंबियांनी केलेल्या प्रतिकारात हा वाघ जखमी झाला का, अशी शंका निर्माण झाली आहे. वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Shekhar Suman: शेखर सुमनचा भाजपात प्रवेश? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

US-Iran War: अमेरिकेचे इराणवर 7 तास बॉम्ब हल्ले; होर्मुझ सामुद्रधुनीत पुन्हा युद्धाचा भडका

Thursday Horoscope: खर्चावर नियंत्रण ठेवा, 5 राशींच्या व्यक्तींच्या व्यवसायात होणार भरभराट ; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Healthy Food : ब्राऊन की व्हाईट, कोणता ब्रेड शरीराला हानिकारक? वेळीच सावध व्हा नाहीतर...

तुकाराम मुंढे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका; पुण्यातील दुकानावर FDA ची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT