Leopard Attack Chandrapur News Saam tv
महाराष्ट्र

Chandrapur News: आईच्‍या डोळ्यादेखत चार वर्षीय मुलगा बिबट्याच्‍या जबड्यात; अंगणातून नेले उचलून

आईच्‍या डोळ्यादेखत चार वर्षीय मुलगा बिबट्याच्‍या जबड्यात; अंगणातून नेले उचलून

संजय तुमराम

चंद्रपूर : अंगणात बसलेल्‍या एका चार वर्षीय बालकाला बिबट्याने उचलून नेत ठार केले. आईच्या डोळ्यादेखत ही घटना घडली. बिबट्या (Leopard) मुलाला नेत असल्‍याचे पाहून आईने हंबरडा फोडला. यावेळी आजूबाजूचे नागरीक (Chandrapur) गोळा झाले. परंतु, मुलाला वाचविता आले नाही. (Latest Marathi News)

चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा मानव- वन्यजीव संघर्ष सुरू झाल्याचे या घटनेने सिद्ध केले. उन्हाळा सुरू होताच वन्यजीव गावाकडे येऊ लागल्याने हा संघर्ष येत्या दिवसांत पुन्हा तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्‍यान घरासमोरील अंगणात शौचास बसलेल्या मुलाला बिबट्याने आईच्या डोळ्यासमोर उचलून नेले. सावली तालुक्यातील बोरमाळा येथे काल बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली. हर्षद कारमेंगे असे हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे.

घरापासून काही अंतरावर सापडला मृतदेह

आज सकाळी घरापासून एक किलोमीटर अंतरावर एका शेतात त्याचा मृतदेह सापडला. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अंगणातून बिबट्याने मुलाला उचलून नेल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : मोठी बातमी: मुंबईत भाजप आमदाराच्या कारचा भीषण अपघात, फ्री वे वर ३ वाहनांना धडक

Maharashtra News Live Update: रोहित पवारांचा दुष्काळी दौरा; ‘काजू-बदाम खाऊन तरी बुद्धी चालवा’, सरकारवर जोरदार टीका

मोठी बातमी! मिरजमध्ये सरकारी रुग्णालयाचा स्लॅब कोसळला; 6 जण ढिगाऱ्याखाली अडकले, 2 जणांचा मृत्यू

8th Pay Commission Update: 3.25 फिटमेंट फॅक्टरची मागणी चर्चेत; केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत मोठी अपडेट

Actress Death: चित्रपटसृष्टीला मोठा धक्का; ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

SCROLL FOR NEXT