Nagbhid lake Five people drowned Saam Tv News
महाराष्ट्र

Chandrapur News : अख्खं गाव तलावाच्या काठाला, भावांसह पाचही जणांचे मृतदेह काढले; आई-वडिलांच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा

Chandrapur Five Youths Lake Were Rescued : घोडाझरी तलावात बुडून पाच युवकांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर पोलिसांनी वेळीच घटनास्थळ गाठत बचावकार्य सुरू केलं. यात पाचही युवक पर्यटनासाठी आले होते.

Prashant Patil

चंद्रपूर : चंद्रपुरात एक अत्यंत दु:खद घटना उघडकीस आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथील घोडाझरी तलावात ५ जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या घटनेत फक्त एकाचा जीव वाचला आहे. पाच जणांच्या मृत्यूने गावात खळबळ उडाली आहे. तर आता पाचही युवकांचे मृतदेह शोधून बाहेर काढण्यात यश मिळालं आहे.

घोडाझरी तलावात बुडून पाच युवकांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर पोलिसांनी वेळीच घटनास्थळ गाठत बचावकार्य सुरू केलं. यात पाचही युवक पर्यटनासाठी आले होते. तुडुंब भरलेल्या तलावात सहा युवक उतरले. यात जनक गावंडे , यश गावंडे, अनिकेत गावंडे, तेजस गावंडे, तेजस ठाकरे या पाच जणांचा बुडून मृत्यू झाला, तर एक जण सुखरूप बचावला. हे सर्व मित्र चिमूर तालुक्यातील साठगाव कोलारीचे रहिवासी आहेत. यात दोन सख्खे भाऊ आणि दोन चुलत भाऊ आणि एका मित्राचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि दिवस बुडण्याच्या आत पाचही जणांचे मृतदेह काढण्यात प्रशासनाला यश आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक गाडी, तीन मजली घर अन् पार्किंग चक्क गच्चीवर! बिहारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

SCROLL FOR NEXT