Chandrapur News Update, Rainfall In Chandrapur Maharashtra, Maharashtra Heavy Rainfall saam tv
महाराष्ट्र

Rain Update : गडचिरोलीत दहा हजारांवर नागरिकांचे स्थलांतर; चंद्रपूरात पावसाचा जोर ओसरला

गोदावरी नदीच्या वाढत्या पाण्यामुळे नागरिकांना स्थलांतरित करावे लागले असं प्रशासनाने कळविले आहे.

संजय तुमराम

चंद्रपूर/ गडचिराेली : चंद्रपूर (chandrapur) जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाने (rain) विश्रांती घेतली आहे. आज (शुक्रवार) सकाळपासून आभाळ मात्र ढगाळलेले आहे. दरम्यान गडचिरोली (gadchiroli) जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे दहा हजारांवर नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. (Chandrapur News Update)

चंद्रपूर जिल्ह्यात गेले काही दिवसांपासून पावसानं झाेपडलं आहे. गेले सात दिवस चंद्रपूरकरांना सूर्यदर्शन झालेले नाही. जिल्ह्यातील तेलंगणाला जोडणारा राजुरा शहराजवळील वर्धा नदी पूल मात्र अद्याप पाण्याखाली आहे. चंद्रपूर शहरातील रहमतनगर- सहारा पार्क - राज नगर भागातील पूर अंशतः उतरण्यास सुरुवात झाली आहे. चंद्रपूर शहरालगतच्या इरई धरणाची सातही दारे 0.25 मीटर्सने खुली आहेत.

चंद्रपूर शहरातील दाताळा मार्ग रहदारीसाठी खुला झाला आहे. जिल्ह्यातील ब्रम्हपुरी उपविभागात वैनगंगा नदीत गोसेखुर्द धरणाच्या पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे पाऊस नसतानाही प्रमुख पूल आणि रस्ते बंद आहेत. गोंडपिपरी तालुक्यातील आष्टी येथील पुलावर दाेन फूट पाणी असल्याने चंद्रपूर-अहेरी मार्ग बंद आहे. (Chandrapur Rain Update)

गडचिरोली जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे एकूण दहा हजार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. जिल्ह्यातील दक्षिण भागात पूर परिस्थिती जैसे थे असून पावसाच्या अधून-मधून सरी बरसत आहेत. वैनगंगा -गोदावरी आणि प्राणहिता नद्यांनी आसपासच्या गावांमध्ये पूरस्थिती आणली आहे. दक्षिण गडचिरोलीला चंद्रपूर जिल्ह्याशी जोडणारा आष्टी पूलही पुराच्या पाण्याखाली आहे.

सिरोंचा तालुक्यातून सर्वाधिक नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर झाले आहे. आलापल्ली ते भामरागड हा रस्ता पर्लकोटा नदीचा पूर ओसरल्याने खुला झालाय. तर गडचिरोली ते आरमोरी मार्गही पाल नदीचे पाणी ओसरल्याने सुरू झालाय. गोसेखुर्द धरणाचे पाणी वैनगंगा नदीत प्रवाहित झाल्यानंतर काही प्रमुख मार्ग अद्यापही बंद आहेत. जिल्हा प्रशासन स्थलांतरित नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा पुरविण्याकडे लक्ष देत आहे. (Maharashtra Heavy Rainfall)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांना बसणार फटका?

Mobile Safety Tip : मोबाईल भिजल्यावर तांदळाच्या डब्यात ठेवताय? जाणून घ्या खरंच फोन दुरूस्त होतो का

पोलीस खात्यात बदल्यांचा 'पार्ट-२'! एका अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली, दुसऱ्याची बदलीनंतरही 'तीच' खुर्ची कायम

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डी विमानतळावर दाखल

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

SCROLL FOR NEXT