Chandrapur Crime News Saam tv
महाराष्ट्र

Chandrapur Crime News : दुचाकी लावण्यावरून वाद; दोन जणांना बोलावून केले भयानक कृत्य, मुलाचा मृत्यू, चार जखमी

Chandrapur News : चंद्रपूर जिल्ह्यातील मूल या गावात वास्तव्यास असलेल्या कामडी परिवारावर हा हल्ला चढविण्यात आला आहे. या घटनेत प्रेम कामडी या मुलाचा मृत्यू झाला आहे.

संजय तुमराम

चंद्रपूर : शेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला. याच वादातून दोन गावगुंडांना बोलावून कुटुंबाला मारहाण केली. तसेच चाकूने वार करत एका सतरा वर्षीय मुलाचा खून करण्यात आला. तर घटनेतील मृत मुलाचे चार आप्त चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. सदरची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे घडली.

चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील मूल या गावात वास्तव्यास असलेल्या कामडी परिवारावर हा हल्ला चढविण्यात आला आहे. या घटनेत प्रेम कामडी या मुलाचा मृत्यू झाला आहे. कामडी परिवार व त्यांच्या शेजारी राहणाऱ्या कुटुंबात रस्त्यात दुचाकी लावण्यावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला कि थेट काटा काढण्याचे परिवाराने ठरविले. यावरून एका कुटुंबाने चंद्रपूरवरून दोन गुंड बोलावले. या (Crime News) गुंडांनी रात्री गावात येऊन कामडी कुटुंबावर हल्ला केला. चाकू घेवून असलेले हे दोन गुंड चाकूने सपासप वार करीत होते. 

पोलिसांनी ६ जणांना घेतले ताब्यात 

चाकूने वर करत असताना सतरा वर्षांचा प्रेम कामडी या मुलाचा मृत्यू झाला. तर कामडी कुटुंबातील इतर चार जण जखमी झाले. जखमींना लागलीच उपचारासाठी चंद्रपूरला हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच मूल पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत सहा आरोपींना ताब्यात घेतले. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ आज मूल बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blood Pressure Foods: ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी हे 5 पदार्थ जरूर खा, हार्ट देखील राहिल हेल्दी

Fake Baba: दारू सोडायला गेला, बाबाने धू धू धुतलं; VIDEO व्हायरल

Matka King Review : विजय वर्माचा 'मटका किंग' पास की फेल? प्रेक्षकांना कसा वाटला?

Kalyan Tourism : प्राचीन भिंती अन् भक्कम दरवाजे, कल्याणमधील 'हा' किल्ला जपतोय ऐतिहासिक वारसा

Ladki Bahin Yojana: उरला फक्त शेवटचा आठवडा! लाडक्या बहिणींनो आताच eKYC करा, अन्यथा ₹१५०० कायमचे बंद होणार; प्रोसेस वाचा

SCROLL FOR NEXT