चंद्रपूर काँग्रेस गटनेता वाद ताज्या घडामोडी
धानोरकर समर्थकांनी विभागीय आयुक्तांकडे का धाव घेतली
चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष
चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष पुन्हा उफाळून आला आहे. प्रतिभा धानोरकर गटाचे 16 नगरसेवक राजेश अडूर यांना गटनेतेपदावरून हटवण्यात यावे. त्यांच्या जागी सुरेंद्र अडबाले यांना गटनेते पदी निवडण्यात यावं, अशी मागणी घेऊन धानोरकर गटाचे नगरसेवक विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचले आहेत. विभागीय आयुक्तांकडून त्या संदर्भात कुठलाही निर्णय अजून झालेला नसताना विद्यमान गटनेते राजेश अडूरही त्यांच्या काही समर्थकांसह विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचलेत.
काँग्रेसच्या महापालिका गटाचे नेतृत्व विजय वडेट्टीवार समर्थकांकडे राहू नये, अशी भूमिका धानोरकर समर्थकांनी घेतली आहे. त्यामुळे पक्षांतर्गत मतभेद पुन्हा सर्वांसमोर आलेत. काल चंद्रपुरात प्रतिभा धानोरकर यांच्या कार्यालयात झालेली धानोरकर गटाच्या नगरसेवकांची बैठक मुळातच बेकायदेशीर होती. कारण त्या बैठकीत सहभागी असलेल्या नगरसेवकांनी गटनेता म्हणून राजेश अडूर यांनी काढलेल्या व्हीपचा उल्लंघन केला होता असा आक्षेप राजेश अडूर यांचा आहे.
धानोरकर गटाच्या बैठकीत काल सहभागी झालेल्या सर्व नगरसेवकांना डिस्क्वालीफाई करण्यात यावं, अशी मागणी राजेश अडुर यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात केली आहे. त्यामुळे चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेस गटनेतेचा वाद प्रलंबित राहण्याची आणि त्यावर अनेक दिवस कायदेशीर डावपेच सुरू राहण्याची शक्यता आहे.
नगरसेवकांचे संख्याबळ आपल्या बाजूला दाखवत धानोरकर गटाने गटनेतेपदावर मजबूत दावा केला आहे. आता विभागीय आयुक्त कार्यालय आणि पक्षश्रेष्ठी यावर काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मात्र या संघर्षामुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून, त्याचे राजकीय परिणाम दूरगामी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.