Beed Crime News Saam tv
महाराष्ट्र

Beed Crime News : मैत्रिणीस पुण्याला पळवून नेले, आई-वडिलांना किस्सा समजताच पायाखालची सरकली वाळू

पाेलिस या घटनेचा तपास करीत आहेत.

विनोद जिरे

Beed News : अल्पवयीन मुलाने मित्रांच्या मदतीने अल्पवयीन मुलीस पुण्यात पळवून नेल्याची घटना बीड जिल्ह्यात समाेर आली आहे. ही घटना नातेवाईकांमुळे उघडकीस आली असून याप्रकरणी चकलंबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Maharashtra News)

बीडच्या गेवराई तालुक्यात असणाऱ्या एका गावातील अल्पवयीन मुला आणि मुलीची मैत्री झाली. मुलीचे वय अवघे 13 असून मुलांचेही त्यापेक्षा दोन वर्ष जास्त आहे. 26 जून रोजी गावातीलच एकाने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला.

त्यानंतर इतर दोन मित्रांच्या मदतीने ते नगरपर्यंत गेले. तेथून दोन मित्र परत आले तर पीडिता व मुलगा हे पुण्याला गेले. पुण्यातील एका नातेवाइकांकडे त्यांनी आश्रय घेण्याचा प्रयत्न केला. काही तास राहिल्यानंतर नातेवाइकांना यांच्याबद्दल संशय आला. त्यांनी गावाकडे विचारणा केल्यावर हे पळून आल्याचे समजले.

नातेवाईकांची सजगता

तेथील नातेवाइकांनीही सजगता दाखवत त्यांना भोसरी पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर पोलिसांनी नातेवाइकांना पुण्याला बोलावून घेत दोन्ही अल्पवयीन मुलांना त्यांच्या स्वाधीन केले. परंतु परत आल्यावर पीडितेने सर्व प्रकार आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर चकलांबा पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून अत्याचार करणाऱ्यासह पळवून जाण्यास मदत करणाऱ्या दोन मित्रांवर पाेलिसांनी (police) गुन्हा दाखल केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPI New Rules : UPI युजर्सला मोठा धक्का, ५ हजारांपेक्षा जास्त पाठवल्यास चार्ज लागणार; जाणून घ्या सरकारचा नवा नियम

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

Latur News: शिक्षण संस्थाचालकाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं; लातूर हादरले

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

SCROLL FOR NEXT