Chakan , Police, Rohit Sahani Case Saam Tv
महाराष्ट्र

Chakan News : फिल्मी स्टाईलनं घेतला मित्राच्या खूनाचा बदला; १२ अटकेत

चाकण परिसरात गुन्हेगारी विश्वात बालगुन्हेगारांचा वाढलेला सहभाग चिंतेचा विषय बनला आहे.

रोहिदास गाडगे

Chakan News : एक वर्षापुर्वी झालेल्या मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी चाकण (chakan) येथील १२ युवकांनी नियोजनबद्ध एकाचा खुन केला. युसुफ काकरचा या प्लॅनमध्ये फिल्मी स्टाईलने मारला गेला. या खुनातील सहा अल्पवयीन आणि सहा युवकांना (youth) चाकण (chakan) पोलीसांनी अटक केली आहे. (Breaking Marathi News)

चाकण मार्केट यार्डजवळ रोहित साहनी या युवकाचा दगडाने ठेचून खून झाला होता. या प्रकरणात मुख्य संशियत आरोपी काकर हा होता. रोहित याच्या खूनाचा बदला घेण्यासाठी त्याच्या मित्रांनी कट रचला. (Chakan Latest Marathi News)

प्रणव शिंदे याच्यासह ११ जणांनी प्लॅन करुन रोहकल येथील रस्त्यावर काकर याचा कोयत्याने वार करुन खुन केला. चाकण पोलीसांनी दोन दिवसांत १२ संशियत आरोपींना अटक केली आहे अशी माहिती चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे व पोलिस निरीक्षक अनिल देवडे यांनी दिली. या सर्वांनी मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हे कृत्य केल्याचे पाेलिसांनी सांगितले. दरम्यान यामधील सहा जण अल्पवयीन आहेत. चाकण परिसरात गुन्हेगारी विश्वात बालगुन्हेगारांचा वाढलेला सहभाग चिंतेचा विषय बनला आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मराठीची रचना जैनांनी केली, मुंबईत जैन विद्यापीठ हवे - जैन मुनी

Maharashtra Live News Update: सुषमा अंधारेंचे आरोप धादांत खोटे; तक्रार असल्यास मुख्यमंत्र्यांकडे पुरावे द्यावेत - दीपक साळुंखे

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

SCROLL FOR NEXT