Railway News Saam tv
महाराष्ट्र

Railway News : मुंबई पुणेकरांसाठी गूड न्यूज! उन्हाळ्याच्या सुट्टीला आरामात जा गावाकडे, रेल्वेकडून नव्या गाड्यांची घोषणा, वाचा

Railway News : उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून ८ विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई, पुणे, नागपूर आणि मडगांव मार्गावर अतिरिक्त गाड्या चालवण्यात येणार आहेत.

Alisha Khedekar

  • मध्य रेल्वेकडून ८ विशेष गाड्यांची घोषणा

  • उन्हाळी सुट्टीतील गर्दी लक्षात घेऊन निर्णय

  • मुंबई, पुणे, नागपूर, मडगांव मार्गावर सेवा

  • प्रवाशांसाठी सोयीस्कर प्रवासाची सुविधा

  • एप्रिल महिन्यात विशेष गाड्या सुरू

थोड्याच दिवसांत लहान मुलांच्या वार्षिक परीक्षा संपून उन्हाळ्याची सुट्टी सुरु होईल. तसेच या उन्हाळी सुट्टीत अनेकजण विविध पर्यटनस्थळी फिरण्याच्या निमित्ताने जातात. या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे.मध्य रेल्वे उन्हाळ्याच्या हंगामात प्रवाशांच्या सोयीसाठी ८ अतिरिक्त विशेष गाड्या चालवणार आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांना भर उन्हामध्ये आरामदायी प्रवास करता येईल.

लोकमान्य टिळक टर्मिनस–नागपूर–लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष २ फेऱ्या

ट्रेन क्रमांक 01021 ही विशेष गाडी ३ एप्रिल रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ००.५५ वाजता निघेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १५.४५ वाजता पोहोचेल. ट्रेन क्रमांक 01022 ही विशेष गाडी दिनांक ३ एप्रिल रोजी नागपूर येथून २०.०० वाजता निघेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ११.४५ वाजता पोहोचेल. या रेल्वेगाड्यांचे थांबे ठाणे, कल्याण, इगतपुरी (ट्रेन क्रमांक 01022 साठी), नाशिक रोड, मनमाड, जळगांव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे असतील.

पुणे–नागपूर–पुणे विशेष २ फेऱ्या

ट्रेन क्रमांक 01467 ही विशेष गाडी ३ एप्रिल रोजी पुणे येथून १५.५० वाजता निघेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ०६.३० वाजता पोहोचेल. ट्रेन क्रमांक 01468 ही विशेष गाडी दिनांक ४ एप्रिल रोजी नागपूर येथून ०८.०० वाजता निघेल आणि पुणे येथे त्याच दिवशी २३.३० वाजता पोहोचेल. या रेल्वे गाड्यांचे थांबे उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगांव, भुसावळ, मलकापूर, शेगांव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे असतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–मडगांव–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष ४ फेऱ्या

ट्रेन क्रमांक 01129 ही विशेष गाडी ३ एप्रिल आणि ५ एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.२० वाजता निघेल आणि मडगांव येथे त्याच दिवशी १५.१५ वाजता पोहोचेल. तसेच ट्रेन क्रमांक 01130 ही विशेष गाडी ३ एप्रिल आणि ५ एप्रिल रोजी मडगांव येथून १६.०० वाजता निघेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०३.४५ वाजता पोहोचेल. या दोन्ही रेल्वे गाड्यांचे थांबे दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगांव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी इथे असतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

SCROLL FOR NEXT