celebration of rajmata jijau jayanti at raigad saam tv
महाराष्ट्र

Rajmata Jijau Jayanti: राजमाता जिजाऊ, शिवरायांच्या जयघोषाने रायगड दुमदुमला; 'वंचित'चे अकाेल्यात अनाेखे आंदाेलन

Siddharth Latkar

- हर्षदा साेनाने / सचिन कदम

Rajmata Jijau Jayanti 2024 News :

राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त अकोला शहरात आज (शुक्रवार) वंचित बहुजन आघाडीने शहरातील राजमाता जिजाऊ सभागृहाची स्वच्छता करुन अनाेखे आंदाेलन केले. शासनाने जिजाऊंच्या सभागृहाची दुरुस्ती करावी अन्यथा वंचित बहुजन आघाडी रथयात्रा काढून जनतेतून वर्गणी गोळा करून सभागृहाची दुरुस्ती करेल असा इशारा यावेळी वंचित बहुजन आघाडीने प्रशासनास दिला. (Maharashtra News)

राज्यभरात आज राजमाता जिजाऊ यांचा आज 426 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा होत आहे. अकाेल्यात एकमेव असलेल्या राजमाता जिजाऊ सभागृहाची दयनीय अवस्था झाली आहे. याकडे बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले. जिजाऊ सभागृहाची दयनीय अवस्था पाहता शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने साफसफाई अभियान राबविण्यात आले.

या सफाई मोहिमेत प्रामुख्याने प्रकाश आंबेडकर (prakash ambedkar) यांच्या पत्नी अंजलीताई आंबेडकर (anjalo ambedkar) आणि पुत्र सुजात आंबेडकर (sujat ambedkar) यांनी सहभाग घेतला. सर्वांनी मिऴून जिजाऊ सभागृहाची स्वछता केली. वंचित बहुजन आघाडीकडून अकोला शहरातील 21 मुख्य चौकात स्वछता व स्वाक्षरी अभियान राबवून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान शासनाने लक्ष न दिल्यास वंचित बहुजन आघाडीकडून रथयात्रा काढून लोकांकडून पाच-पाच रुपये वर्गणी गोळा करून जिजाऊ सभागृहाची दुरुस्ती करेल असे वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केले.

पाचाड समाधी स्थळी जिजाऊंची जयंती साजरी

राजमाता जिजाऊंची 426 वी जयंती रायगडमध्ये साजरी करण्यात आली. स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडाच्या (raigad fort) पायथ्याशी राजमाता यांचे समाधी स्थळ आहे. या समाधी स्थळी विधीवत पुजन करून राजमातांची जयंती साजरी करण्यात आली.

रायगड जिल्हा परिषद आणि पाचाड ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने हा जयंती सोहळा झाला. महाडचे आमदार भरत गोगावले (mla bharat gogawale), माजी जिल्हा परिषद सदस्य बाळकृष्ण राऊळ यांनी समाधी स्थळाचे पुजन केले.

विद्यार्थ्यांकडून जिजाऊ, शिवरायांचा जयघाेष

यावेळी उपस्थितीत शाळकरी विद्यार्थ्यांनी झांज वाजवुन नृत्य सादर केले. राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषाने आसमंत दुमदुमला. एका छोटेखानी सभेने या जयंती सोहळ्याची सांगता करण्यात आली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT