सचिन बनसोडे, शिर्डी
Shirdi News: साईबाबांच्या शिर्डीमध्ये गुन्हेगारीच्या (Shirdi Crime) घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. साईबाबांचे (Saibaba) दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भक्तांची लूट केली जाते. तसंच, चेन स्नॅचिंगच्या घटना देखील शिर्डीत वाढल्या आहेत. आता या गुन्हेगारीच्या घटनांना आळा बसणार आहे. कारण शिर्डीमध्ये चोरांवर सीसीटीव्हीची नजर असणार आहे. पोलिस प्रशासनाने (Shirdi Police) शिर्डीतील प्रत्येक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Camera) बसवले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून शिर्डीत गुन्हेगारी वाढली असून चेन स्नॅचिंग, दुचाकी चोरी, साईभक्तांना मारहाण, भाविकांची होणारी लूट अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. या गुन्हेगारांवर पोलिसांकडून कडक कारवाई केली जात आहे. पण असे असताना देखील या घटनांना आळा काही बसत नाही. त्यामुळे या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
पण आता या गुन्हेगारीच्या घटनांना आळा बसणार आहे. त्यासाठी पोलिसांकडून मोठे पाऊल उचलले जात आहे. आता शिर्डीमध्ये चोरट्यांवर सीसीटीव्हीची करडी नजर असणार आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सुचनेवरून पोलिस प्रशासनाने शिर्डीतील प्रत्येक चौकात अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास सुरूवात केली आहे. शिर्डीतील रस्त्यांवर जवळपास 100 कॅमेर्यांची नजर राहणार आहे. यामुळे शिर्डीतील गुन्हेगारांवर नक्कीच वचक बसणार असल्याचे बोलले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.