NAshik NEws Saam Tv
महाराष्ट्र

Nashik CCTV Footage : केस कापताना तरुणावर कोयत्याने सपासप वार; थरारक घटनेचा VIDEO आला समोर

Nashik Crime News : नाशिकच्या देवळाली गावात घडली आहे. अमन शेख अस जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.

प्रविण वाकचौरे

Nashik Crime News :

नाशिकमधील वाढती गु्न्हेगारी पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे. गेल्या काही दिवसात नाशिकमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गुन्हेगारांना धाक राहिला की नाही अशी स्थिती आहे. अशीच एक घटना नाशिकच्या देवळाली गावात घडली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सलूनमध्ये केस कापण्यासाठी बसलेल्या तरुणांवर टोळक्याने कोयत्याने हल्ला केला आहे. तीन-चार हल्लेखोरांनी तरुणांवर कोयत्याने सपासप वार केले. या घटनेत तरुण गंभीर जखमी आहे. हा सगळा थरारक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अमन शेख अस जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. (Nashik Crime News)

व्हिडीओत दिसत आहे त्यानुसार, अमन सलूनमध्ये केस कापण्यासाठी बसला आहे. कटिंगला बसलेल्या या युवकावर टोळक्याने दुकानात घुसून काही कळाच्या आधीच कोयत्याने हल्ला चढवला.

तीन-चार जण युवकावर जोरदार हल्ला करत असताना जीव वाचवण्यासाठी तो खाली बसला. तरीही हल्लोखोरांनी त्याच्यावर कोयत्याने हल्ले सुरु ठेवले. काही वेळात हल्लेखोर पळून जातात. हल्ल्यात संबंधित युवक गंभीर जखमी झाला आहे.

पुढील उपचारासाठी युवकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जुन्या भांडणाच्या वादातून हा हल्ला केला असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Shreyas Iyer: ‘योग्य वेळ आली की तो राज्य करेल’, वैभव सूर्यवंशीच्या भवितव्याबाबत श्रेयस अय्यरचा मोठा विश्वास

Pune News: माझ्या बॉयफ्रेंडला एड्स आहे, तरी मी त्याच्याशीच लग्न करणार, पुण्यामध्ये कॉलेजला गेलेली २२ वर्षीय तरुणी बेपत्ता

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

SCROLL FOR NEXT