mp dr jaisiddeshwar shivacharya mahaswami, solapur saam tv
महाराष्ट्र

MP Dr Jaisiddeshwar Shivacharya Mahaswami : भाजप खासदारांच्या 'त्या' प्रकरणाची ऑगस्ट महिन्याच्या तिस-या आठवड्यात हाेणार सुनावणी

Solapur News : विभागीय समितीने पुन्हा चाैकशी करावी असा आदेश उच्च न्यायालयाने दिला हाेता.

विश्वभूषण लिमये

Caste Certificate Case : भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी (mp dr jaisiddeshwar shivacharya mahaswami) यांच्या जातीचा दाखल्याबाबतचे सुनावणी आता पुढे गेली आहे. ऑगस्ट महिन्याच्या तिस-या आठवड्यात ही सुनावणी हाेईल. (Maharashtra News)

सोलापूर लोकसभा मतदारसंघ (solapur lok sabha constituency) अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. खासदार डॉ. जयसिद्धेश्वर यांनी निवडणुकीसाठी बेडा जंगम जातीचा दाखला सादर केला होता. हा दाखला बोगस असल्याची तक्रार प्रमोद गायकवाड, मिलिंद मुळे, विनायक कंडकुरे यांनी केली होती.

त्यानंतर विभागीय जात पडताळणी समितीने चौकशी करून हा दाखला रद्द केला. त्यावर सुनावणी हाेऊन अक्कलकोटच्या (akkalkot) तहसीलदारांना खासदारांचा जातीचा दाखला रद्द करण्याचे आदेशही दिले. त्यास खासदारांच्या वतीने उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली

न्यायमूर्तीनी विभागीय समितीचा दाखला रद्दचा निर्णय रद्द ठरविला. विभागीय समितीने या प्रकरणात पुन्हा चौकशी करावी. सहा महिन्यांच्या आत यासंदर्भात निर्णय घ्यावा असे आदेश दिल्याचे वकील महेश स्वामी यांनी नमूद केले.

दरम्यान या प्रकरणाची सुनावणी आता पुढे गेली आहे. येत्या 17 ऑगस्टला पुढील सुनावणी हाेणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sachin Pilgaonkar : महागुरू सचिनचा नवा दावा, माझं गाणं 'त्यांनी' ऐकलं अन् अखेरचा श्वास घेतला

Washim : गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक; १२ किलो गांजा जप्त

Sai Tamhankar Photos: खोल गळ्याच्या ब्लाऊजमध्ये सईचं खुललं सौंदर्य, फोटो तुम्हालाही आवडतील

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

'ऑपरेशन लोटस'ला तडा, या माजी आमदाराच्या पक्ष प्रवेशाला विरोध, भाजप कार्यकर्तांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT