latur, crime news saam tv
महाराष्ट्र

Latur : रेणापूरात क्लबवर धाड; जुगार साहित्यासह पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त, ३९ जणांवर गुन्हा

या कारवाईमुळे जुगार खेळणा-यांचे धाबे दणादणले आहेत.

दीपक क्षीरसागर

लातूर : लातूर (Latur) जिल्ह्यातील रेणापूर येथील एका क्लबवर चाकूर- रेणापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने धाड टाकून तिर्रट जुगार खेळणाऱ्या ३९ जणांना रंगेहाथ पकडले. या पथकानं घटनास्थळावरुन १ लाख ७२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Latur Crime News)

उपविभागीय पोलीस अधिकारी निकेतन कदम यांच्या पथकाला रेणापूरजवळील एका बारजवळ क्लबमध्ये जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे सोमवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास छापा मारला असता ३९ जण तिर्रट नावाचा जुगार खेळताना निदर्शनास आले.

त्यांच्याकडून जुगार साहित्यासह १ लाख ७२ हजार १३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस निरिक्षक दीपक शिंदे, सहाय्यक पोलीस निरिक्षक बालाजी भंडे या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईमुळे जुगार खेळणा-यांचे धाबे दणादणले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT