yavatmal, gramsevak Saam Tv
महाराष्ट्र

Viral Audio : गावात येऊन मारीन ! शेतक-याला ग्रामसेवकाची धमकी, गुन्हा दाखल

त्यावेळी दाेघांचा संवाद सुरु असतानाच अचानक वाद झाला.

साम न्यूज नेटवर्क

- संजय राठोड

यवतमाळ (yavatmal) जिल्ह्यातील एका शेतक-याला फाेनवरुन शिवीगाळ केल्या प्रकरणी पाेलिसांनी संबंधित ग्रामसेवकावर गुन्हा दाखल केला आहे. ग्रामसेवकाने धमकाविल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली हाेती. ती साम टीव्हीच्या देखील हाती लागली. साम टीव्हीने त्याचे वृत्त प्रसारित केल्यानंतर पाेलिसांनी घटनेची गांभीर्य लक्षात घेता ग्रामसेवकावर (gramsevak) गुन्हा दाखल केला.

पाेलिसांनी (police) दिलेल्या माहितीनूसार यवतमाळच्या महागांव तहसिल अंतर्गत येणाऱ्या पोखरी येथील शेतकरी गोकुळ गव्हाणे यांच्या पत्नीच्या खात्यात नुकसान भरपाईचे पैसे जमा न झाल्याने त्याची माहिती घेण्यासाठी त्यांनी ग्रामसेवक अर्जन हांडे यांना फाेन केला.

त्यावेळी दाेघांचा संवाद सुरु असतानाच अचानक वाद झाला. दाेघे एकमेकांना व्यवस्थित बाेल असे म्हणून लागले. त्यातूनच ग्रामसेवकाने शेतकऱ्याला अश्लील शिवीगाळ केली. तसेच गावात येऊन मारण्याची धमकी दिली. दाेघांच्या संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. महागांव पोलिसांनी ग्रामसेवक अर्जुन हांडे विरोधात गुन्हा दाखल केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इंजिनिअरसह आख्या कुटुंबाची गोदावरी नदीत उडी; 5 जणांच्या हत्येप्रकरणी कोचला अटक

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

SCROLL FOR NEXT