Crime News, yavatmal SaamTv
महाराष्ट्र

Panchayat Samiti News : बीडीओंच्या घरी जाऊन ग्रामसेवकाने असं काही केले पत्नीने थेट गाठलं पाेलिस ठाणे

या घटनेमुळे प्रशासकीय कार्यालयात एकच खळबळ उडाली.

साम न्यूज नेटवर्क

- संजय राठाेड

यवतमाळच्या (yavatmal) पांढरकवडा पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांना घरी जाऊन धक्काबुक्की करीत जीवे मारण्याची धमकी ग्रामसेवकासह एकाने दिली. यामुळे पंचायत समितीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. (Maharashtra News)

गटविकास अधिकारी विठ्ठल जाधव हे गत सहा महिन्यापासून पांढरकवडा पंचायत समितीला कार्यरत आहे. ग्रामसेवकासह अन्य एकाने त्यांच्या घरी जाऊन आमच्या दोघांविरुद्ध चौकशी का सुरू केली असे म्हणून ठार मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी गट विकास अधिकारी यांच्या पत्नी निर्मला जाधव यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर पाेलिसांकडून (police) दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामसेवकाने (gramsevak) देखील गट विकास अधिकारी दबाव टाकत असल्याची तक्रार पाेलिसांत दिली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : नांदेड- कंधारच्या ग्रामीण रुग्णालयात उंदरांचा सुळसुळाट

Swelling : हातापायांना वारंवार सूज येतेय? दुर्लक्ष करू नका, 'या' गंभीर आजाराचे असू शकते लक्षण

Polymer Notes : १० आणि २० रुपयांच्या नोटांबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १०० कोटी नोटांबाबत संसदेत केली 'ही' घोषणा

टाटा ग्रुपमध्ये मोठी उलथापालथ! एन.चंद्रशेखरन यांचा तडकाफडकी राजीनामा; कॉर्पोरेट जगतात खळबळ

मऊ, खुसखुशीत रूमाली रोटी घरी कशी बनवायची? जाणून घ्या सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT