crime saam tv
महाराष्ट्र

Kokan: बैलांची झुंज; मुंबईच्या माजी महापौरांसह ११ जणांवर काेकणात गुन्हा दाखल

हा व्हिडीओ पाहून संतापजन्य प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

साम न्यूज नेटवर्क

- विनायक वंजारे

सिंधुदुर्ग : मालवण (malvan) तळगाव येथील बैल झुंज (bull fight) प्रकरणी मुंबईचे (mumbai) माजी महापौर दत्ता दळवी यांच्यासह अन्य प्रमुख ११ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच ही झुंज पाहणाऱ्या शंभरहुन अधिक लोकांवर देखील गुन्हे दाखल झाले आहेत अशी माहिती पाेलिस (police) ठाण्यातून देण्यात आली आहे. (sindhudurg lataest marathi news)

मालवण पोलीस स्थानकात हे गुन्हे दाखल केले गेले आहेत. या बैलझुंज स्पर्धेत सहभागी बैलाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सोशल मीडियावर (social media) बैलांच्या झुंजीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

हा व्हिडीओ पाहून संतापजन्य प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर अनेक सामाजिक संस्था व प्राणीमित्र संघटनांनी याचा निषेध नोंदवत तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी हे गुन्हे दाखल केले आहेत. नितीन बगाटे (पोलीस उपअधीक्षक सिंधुदुर्ग) म्हणाले या प्रकरणी माजी महापौर दत्ता दळवी यांच्यासह अन्य प्रमुख ११ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalashtami 2026: यंदाच्या कालाष्टमीला 'शिव योगा'सोबत बनणार दुर्मिळ योग; पाहा कधी आहे शुभ मुहूर्त

न भूतो न भविष्यती! बायकोने दिली नवऱ्याला पोटगी अन् झाला घटस्फोट; पुण्यातील त्या कपलची गोष्ट ऐकून थक्क व्हाल

Black Saree Designs: काळ्या रंगाच्या साडीचे लेटेस्ट 5 पॅटर्न, प्रत्येक महिलेला शोभून दिसतील

Silver Coins Treasure: घराच्या खोदकामादरम्यान सापडला खजिना; बातमी गावभर पसरताच गावकऱ्यांची उडाली झुंबड

Maharashtra Live News Update: पुण्यासह राज्यात उन्हाचा तडाखा, सलग दोन दिवस कमाल तापमानाने पस्तीशी ओलांडली

SCROLL FOR NEXT