fighting 
महाराष्ट्र

पडळकरांसह शिवसेना- राष्ट्रवादीच्या समर्थकांवर गुन्हा दाखल

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत सोसायटी गटातील उमेदवार पळवा- पळवीवरुन वाद झाला हाेता.

विजय पाटील

सांगली : सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे रविवारी आमदार गोपीचंद पडळकर गट आणि शिवसेना- राष्ट्रवादीच्या गटात हाणामारी झाली हाेती. या राडा प्रकरणी दोन्ही गटाने परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या हाेत्या. त्यानुसार दोन्ही गटातील दहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. gopichand padalkar ncp shivsena bjp fighting sangli marathi news

ही मारामारी आटपाडी येथील साठे चौकात रविवारी झाली हाेती. त्यामुळे तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले हाेते. यावेळी गोपीचंद पडळकर यांनी अंगावर गाडी घातल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस यांनी केला हाेता.

दोन्ही गटाकडून मारामारी आणि जीवे मारण्याच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती डीवायएसपी कदम यांनी दिली. यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावरही आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दुसऱ्या गटातील आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Results : कोण मुख्यमंत्री, कोण आमदार! विधानसभा निवडणूक निकालाआधीच झळकले विजयाचे बॅनर

IND vs AUS : पहिल्या सामन्यात मार्नस लाबुशेनकडून चिटींग? मोहम्मद सिराज संतापला, वादात कोहलीचीही उडी, पाहा Video

Maharashtra Assembly Election Result : धाकधूक अन् टेन्शन वाढलं! १०० मतदारसंघात काटें की टक्कर, काहीही होऊ शकतं, कोण ठरणार किंगमेकर?

VIDEO : अब की बार कुणाचं सरकार? काही मिनिटांत मतमोजणीला सुरुवात

National Cashew Day: जागतिक काजू दिवसाचा इतिहास, महत्व आणि साजरा करण्याच्या पद्धती

SCROLL FOR NEXT