chhatrapati sambhaji nagar, adarsh nagari sahakari patsanstha aurangabad saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar Adarsh Scam : 'आदर्श' चे अध्यक्ष अंबादास मानकापेसह संचालक मंडळावर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल

या घोटाळ्यामुळे ठेवीदारांमध्ये पैसे बुडाल्याच्या भीती निर्माण झाली आहे.

डॉ. माधव सावरगावे

Adarsh Nagari Sahakari Patsanstha Aurangabad : छ्त्रपती संभाजीनगरमधील आदर्श नागरी सहकारी पतसंस्था घोटाळ्यातील सूत्रधार अध्यक्ष अंबादास मानकापे आणि संचालक मंडळाविरुद्ध चौथा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान आदर्श पतसंस्थेचा अध्यक्ष अंबादास मानकापे याच्यासह अन्य संचालक सध्या अटकेत आहेत. (Maharashtra News)

जिल्हा कृषी औद्योगिक बहुउद्देशीय सहकारी संस्थेत त्यांनी 2 कोटी 88 लाख 17 हजार 593 रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याची लेखापरीक्षक दत्तात्रय धुमाळ यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा सिडको पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.

नियमानुसार कामकाज न करणे, बाभूळगाव च्या आदर्श दूध उत्पादक सहकारी संस्थेसाठी 25 लाख 53 हजार रुपयांचा पशुखाद्याची खरेदी करणे, रासायनिक खतांचा बनावट खरेदी असे लाखोंची फसवे हिशोब दाखवण्यात आल्याचे या तक्रारीत नमूद आहे.

दरम्यान आदर्श पतसंस्थेचा अध्यक्ष अंबादास मानकापे याच्यासह अन्य संचालक सध्या अटकेत आहेत. आदर्श पतसंस्थेतील गैरप्रकार उघड झाल्यानंतर सहकार खात्याने प्रशासक समितीची नियुक्ती केली आहे. या समितीने थकीत कर्जाच्या वसुलीला सुरुवात केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stylish Blouse Designs For Woman: साध्या साडीलाही मिळेल रिच लूक! ट्राय करा 5 हटके आणि ट्रेंडी ब्लाऊज पॅटर्न्स

UPI पेमेंट शुल्कावरून सर्वोच्च न्यायालय ॲक्शन मोडमध्ये; केंद्र सरकारसह RBI आणि NPCI ला नोटीस

Kidney Stones : तुम्हाला किडनी स्टोन झालाय? रोज खा 'ही' ४ हिरवी पाने

Maharashtra News Live Update: दुष्काळाच्या मागणीसाठी शेकडो शेतकरी तहसील कार्यालयावर धडकले; सोयाबीन जाळून निषेध

Gold Rate Today: पितृपक्ष सुरू होताच सोनं-चांदी अचानक स्वस्त! सुवर्णनगरीत मोठी घसरण; वाचा आजचे नवे दर

SCROLL FOR NEXT