Hasan Mushrif Latest News Saam Tv
महाराष्ट्र

Hasan Mushrif: मोठी बातमी! आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर 40 कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; कार्यकर्त्यांचा पोलीस स्टेशनला घेराव

तक्रारीनंतर हसन मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनला घेराव घातला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Kolhapur: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. मागील महिन्यात हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील राहत्या घरी ईडी अधिकाऱ्यांनी धाड टाकली होती. आता या प्रकरणातील मोठी बातमी समोर येत असून हसन मुश्रीफ यांच्यावर 40 कोटी रुपयांची फसवणुक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. (Hasan Mushrif)

समोर आलेल्या माहितीनुसार, सरसेनापती संतांची घोरपडे साखर कारखान्याद्वारे सामान्य शेतकरी आणि सभासदांची आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

कागलचे विवेक कुलकर्णी यांनी मुरगूड पोलीस ठाण्यात ही तक्रार केली आहे. आमदार हसन मुश्रीफ यांनी सभासदांची 40 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे या तक्रारीमध्ये म्हणले आहे.

कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ..

दरम्यान, या तक्रारीनंतर हसन मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनला घेराव घातला आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी हसन यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने जोरदार घोषणाबाजी केली तसेच हसन मुश्रीफ यांची तक्रार देखील नोंद करून घेण्याची मागणी केली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Junnar ST Bus Accident: गुंजाळवाडीजवळ शेगाव-कल्याण एसटीचा भीषण अपघात; दोन ते तीनवेळा उलटली बस, दोघांचा मृत्यू, १७ जखमी

चित्रपटसृष्टी हादरली! प्रसिद्ध दिग्दर्शकाची आत्महत्या; नदीमध्ये सापडला मृतदेह

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! सिमेंट मिक्सरने दोघांना चिरडलं, वडिलांच्या डोळ्यासमोर ८ वर्षीय अहानाने सोडले प्राण

Dagdusheth Halwai Ganpati: पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट’ला 'अ' वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा

Diesel Crisis: परभणीत डिझेलची टंचाई, पेट्रोल पंपाबाहेर कॅन घेऊन रांगा; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT