Car stuck in sand at Raigad murud beach during weekend and christmas season 
महाराष्ट्र

Car Stuck on Beach: कोकणातील समुद्र किनारी पर्यटकांचा दिसला अतिउत्साहीपणा, कार थेट वाळूत रुतली

konkan Raigad Latest news: कोकणातील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटक मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. या समुद्र किनाऱ्यांवर आनंद पर्यटकांकडून लुटला जात आहे. मात्र काही अतिउत्साही पर्यटक देखील पाहायला मिळत आहेत.

अमोल कलये

konkan Raigad Latest news:

कोकणातील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटक मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. या समुद्र किनाऱ्यांवर आनंद पर्यटकांकडून लुटला जात आहे. मात्र काही अतिउत्साही पर्यटक देखील पाहायला मिळत आहेत. दापोली तालुक्यातील मुरुड समुद्र किनाऱ्यावर कार नेणं पर्यटकांना भारी पडलं आहे. (latest Marathi News)

कार रुतली वाळूत

रायगडला आलेल्या काही पर्यटकांची कार वाळूत रुतल्यचीही घटना घडल्या आहेत. पाण्यात अडकलेल्या या कारला येथील स्थानिकांनी आणि पर्यटकांनी बाहेर काढलं. तर दुसरीकडे रत्नागिरीतील भाट्ये समुद्र किनारी देखील वाळूत कार रुतली होती. पर्यटकांचा अतिउत्साही पणा पर्यटकांनी अडचणीचा मुद्दा ठरत आहे.

लोणावळ्यात हुल्लाडबाज पर्यटकांची संख्या जास्त,मात्र पोलिसांच दुर्लक्ष...

लोणावळ्यात विकेंड आणि नाताळ सण साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होतायत. टायगर आणि लायन्स पॉईंट या ठिकाणी देखील शेकडो पर्यटकांची गर्दी झाली आहे. यात हुल्लाडबाज पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दरम्यान जीवावर बेतणारे पर्यटन, पर्यटक करत असल्याचं समोर आलं आहे. लायन्स पॉईंट इथे खोलदरी असून संरक्षण जाळ्यावर बसून आणि उभे राहून पर्यटक फोटोसाठी पोज देत आहेत.

आठशे ते एक हजार फूट खोल दरी आहे. तिथेच जीवावर बेतणारे फोटोसेशन पर्यटकांच सुरू आहे. याठिकाणी अक्षम्य लोणावळा पोलिसांच दुर्लक्ष होत असताना दिसत आहे..

येशू ख्रिस्त यांच्या जन्मोत्सव निमित्ताने चर्चवर विद्दुत रोषणाई

येशू ख्रिस्त यांचा जन्म दिवस सोहळा जगभर मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. येशू ख्रिस्त यांनी प्रेम ,क्षमा आणि शांती याचा संदेश दिला. ख्रिस्त जन्मोत्सवाचा आठवडा सुरू असल्याने मावळच्या तळेगाव दाभाडे येथील माउंट कार्मेल या चर्चवर विद्युत रोषणाई करण्यात आली. गेली दहा वर्ष हा उपक्रम सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : महाराष्ट्रात बहुमत कोणाला ? मविआचा प्लान बी तयार

Orry Weight Loss Tips: ओरीने २० किलोपेक्षा जास्त वजन कमी केले, पहा काय आहे सीक्रेट

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

SCROLL FOR NEXT