Car Catches Fire on Mumbai-Goa Highway  SAAM TV
महाराष्ट्र

Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा हायवेवर बर्निंग कारचा थरार; VIDEO पाहा

Ratnagiri News: मुंबई-गोवा महामार्गावर 'बर्निंग कार'चा थरार बघायला मिळाला. महामार्गावरील मोरवंडे मोदगेवाडी येथे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कारनं अचानक पेट घेतला.

साम ब्युरो

जितेश कोळी

Ratnagiri News: मुंबई-गोवा महामार्गावर 'बर्निंग कार'चा थरार बघायला मिळाला. महामार्गावरील मोरवंडे मोदगेवाडी येथे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कारनं अचानक पेट घेतला. या कारमधून पाच प्रवासी प्रवास करत होते. प्रसंगावधान राखून ते कारच्या बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला.

मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai-Goa Highway) अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना घडली. मोरवंडे मोदगेवाडी येथे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कारने अचानक पेट घेतला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही इजा झाली नाही. (Latest Marathi News)

कारच्या बोनेटमधून अचानक धूर निघू लागला. ही बाब कारचालकाच्या लक्षात आली. त्यानं तात्काळ कार रस्त्याच्या कडेला थांबवली. चालकानं बोनेट उघडले. काही क्षणांतच कारने अचानक पेट घेतला. (Car Fire)

VIDEO पाहा!

कारने पेट घेताच प्रसंगावधान राखत आतमध्ये बसलेले पाचही प्रवासी तात्काळ उतरले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेची माहिती मिळताच खेड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.

कारला लागलेली आग त्यांनी आटोक्यात आणली. या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. कार मात्र पूर्णपणे जाळून खाक झाली आहे. अग्निशमन दलाचे जवान दीपक देवळेकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी मदतकार्य केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smit Machhar : मुंबईचा कॅप्टन स्मित मच्छार ठरला देवदूत! जीव धोक्यात घालून १७४ प्रवाशांचे प्राण वाचवले; नेमकं काय घडलं?

Rajpal Yadav Viral Video: 'तुम्हाला बाहेर जावं लागेल...'; मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून राजपाल यादवला खरंच बाहेर काढलं?

Maharashtra News Live Update: प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरण; ठाणे क्राईम ब्राँचकडून ३ महिला ताब्यात

Phone overheating: फोन वारंवार गरम होत असेल तर काय करावं?

Congress: काँग्रेस भवनाबाहेर आढळला महिला नेत्याच्या नवऱ्याचा मृतदेह, डोक्यात गोळी घुसल्याने मृत्यू

SCROLL FOR NEXT